शिक्षक संघाचे उद्या आंदोलन

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

सोलापूर - महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाच्या वतीने शनिवारी (ता. 3) दुपारी दोन ते पाच या वेळेत राज्यातील सर्व जिल्हा परिषदांसमोर धरणे आंदोलन केले जाणार आहे. जुनी पेन्शन योजना लागू करण्यासाठी हे आंदोलन होणार असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष म. ज. मोरे यांनी दिली.

एक नोव्हेंबर 2005 नंतर सेवेमध्ये नियुक्त झालेल्या सर्व शिक्षकांना जुनीच पेंशन योजना लागू करावी, मागील कपातीचे हिशोब देण्यात यावेत या प्रमुख मागण्यांसाठी राज्यभर एकाच दिवशी, एकाच वेळी हे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. राज्यभरातील शिक्षकांनी जुनी पेन्शन योजना लागू करण्याबाबतची मागणी अनेक वेळा सरकारकडे केली आहे. मात्र, त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही. त्यामुळे जुनी पेन्शन योजना लागू केल्याशिवाय गप्प बसणार नसल्याची भूमिका शिक्षक संघाने घेतली आहे, असे मोरे यांनी सांगितले.

Web Title: marathi news solapur news western maharashtra news teacher organisation agitation