मलेशियात अटकेत असलेला तरूण अखेर मायदेशी परत

हुकूम मुलाणी 
शनिवार, 27 जानेवारी 2018

मंगळवेढा : मलेशियातील हॉटेलात कायमस्वरुपी नोकरीसाठी वर्किंग व्हिसा न देता ट्रॅव्हलिंग व्हिसा देऊन फसवणूक झालेल्या तालुक्यातील दिपक माने याची सुटका झाली असून, तो तालुक्यातील मानेवाडी येथील गावी परतला. 

मंगळवेढा : मलेशियातील हॉटेलात कायमस्वरुपी नोकरीसाठी वर्किंग व्हिसा न देता ट्रॅव्हलिंग व्हिसा देऊन फसवणूक झालेल्या तालुक्यातील दिपक माने याची सुटका झाली असून, तो तालुक्यातील मानेवाडी येथील गावी परतला. 

दिपक मानेचे आई-वडील कोल्हापुरला ऊसतोडणीला गेल्याने दिपक आणि त्याच्या आई-वडिलांची भेट झाली नाही. व्हिसा फसवणूक प्रकरण 'सकाळ'ने उजेडात आणून सुटकेसाठी सातत्याने पाठपुरावा केलेबद्दल माने कुटुंबाने 'सकाळ'बद्दल आभार व्यक्त केले. ऊसतोडीवर उदरनिर्वाह करणाऱ्या लिंबाजी माने यांनी दिपकला हॉटेल मॅनेजमेटचे शिक्षणासाठी पाठवले होते. या शिक्षणासाठी त्याची पोलिसपूत्र कौस्तुभ पवारशी ओळख झाली. या ओळखीतून त्याने दिपकला मलेशियात चांगली नोकरी व चांगला पगाराचे आमिष दाखवले. त्यावेळी दिपकच्या वडिलांनी भविष्यात आपली ऊसाची तोडणी सुटेल, या आशेवर उच्चल व अन्य मार्गातून पैसे गोळा करुन त्याला मलेशियात जाण्यासाठी पैशाची तरतूद करून पाठवले होते. वर्किंग व्हिसा नसल्याने पोलिसांनी त्याला अटक केली.

मलेशियातील कायद्याचा भंग केल्याप्रकरणी न्यायालायाने त्याला तीन महिन्यांची शिक्षा सुनावली होती. दरम्यान, कागल येथील प्रविण नाईक यांनी भेटायला जाणे, वकील देणे, एजंटांकडून मूळ पासपोर्ट मिळविणे, त्यांना खाणेपिणे पुरविणे असे शेवटपर्यंत पाठपुरावा केला. त्याचप्रमाणे कुसूम यादव आणि ज्ञानेश्वर मुळे यांचे अनमोल सहकार्य या सर्व प्रक्रियेला लाभल्याने सुटकेची प्रक्रिया सुखकर झाली. त्यांची शिक्षा 14 जानेवारी रोजी संपुष्टात आली .

तुरुंगामध्ये 20 दिवसांचा एक महिना याप्रमाणे आणि इतर सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून काल सुटका झाली.  25 रोजी दिवसभर कागदपत्रे व तिकीट पडताळणी प्रक्रिया पूर्ण करून सात बंदूकधारी अधिकाऱ्यांसोबत येऊन विमानतळावर सोडले. विमानाने हैदराबाद विमानतळावर मायदेशी परतले.

त्यामुळे अंधकारमय जीवनाला प्रकाशाची जोड मिळाल्याने भविष्याच्या आशा पुन्हा पल्लवित झाल्या. 'सकाळ'ने दिपकची सुटका होईपर्यंत पाठपुरावा आणि झालेला घटनाक्रम वृत्तपत्रात दिला. आमच्यावर वाईट प्रसंग आला असताना 'सकाळ'ने आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून आवाज उठवल्याने आम्ही सुटू शकलो, अशी भावना माने परिवाराने व्यक्त केली 

याबाबत दिपक म्हणाला, की माझ्या घरची परिस्थिती अतिशय हलाखीची असून, मी शिकून नोकरी करून घर सावरावे. आई वडीलांची ऊसतोडणी सुटावी. त्यासाठी हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स केला. याचकाळात कौस्तुभ पवार याच्याशी ओळख झाली. परदेशातील सर्व कायदेशीर बाबी पूर्ण करण्यासाठी व दोन वर्षे मला मलेशियात ठेवण्यासाठी आम्हाला अनेक अडचणींना सामोरे जावे लागले. 

कामाचे नाव, कंपनीचे नाव अशी सर्व माहिती असलेले डमी ओळखपत्र दाखविले. त्यामुळे त्याच्या बोलण्यावर आणि वागण्यावर विश्वास ठेवला. मला शिकवत असलेले शिक्षकच पुढे झाल्याने मला महाविद्यालयाकडून पाठविले जात आहे, असेच वाटले होते. इथेच फसवणूक झाली.

कागलचे प्रवीण नाईक यांनी मोठा आधार देत सर्व मदत केली म्हणून लवकर परतलो अन्यथा आमचा मार्ग अधिक अवघड झाला असता. माझी वाट आणखी बिकट आहे. माझे घेतलेले दीड लाख व माझा सहा महिन्यांचा पगार संबधित एजंट कौस्तुभ पवार याने दिल्याशिवाय आमचे कुटुंबाची आर्थिक घडी बसणार नाही. शिवाय भविष्यात परदेशी जाताना खात्रीपूर्वक व्यवहार करावा, असेही दिपक म्हणाला.

Web Title: Marathi News Solapur news youth return from Malaysia