सिद्धेश्वर यात्रेला प्रारंभ; बाराबंदीचा पोषाख प्रमुख आकर्षण

marathi news solapur siddheshwar yatra
marathi news solapur siddheshwar yatra

सोलापूर - बोला बोला एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय असा अखंड जयघोष करीत, सनई चौघड्यांचा मंजुळ आवाज, बँजोवरिल भक्तिगीते आणि हलग्यांच्या कडकडाटात तसेच पांढराशुभ्र बाराबंदीचा पोषाख परिधान केलेल्या हजारो भक्तांच्या उपस्थितीत ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला तैलाभिषेकाने (यन्नीमज्जन) शुक्रवारपासून मोठ्या भक्तिमय वातावरणात प्रारंभ झाला. 

सोलापूरच्या पंचक्रोशीत श्री सिद्धरामेश्वरांनी  केलेल्या ६८ लिंगाना नंदीध्वज मिरवणुकीने तैलाभिषेक करण्यात आला. पांढ-या रंगाच्या बाराबंदीच्या पोशाखातील हजारो सिद्धेश्वर भक्त सर्वांचे लक्ष वेधून घेत होते. नंदीध्वजाच्या लक्षवेधी मिरवणुकीने भक्तांच्या डोळ्याचे पारणे फिटले. तैलाभिषेकासाठी गुरुवारी मध्यरात्रीच मानाच्या पहिल्या व दुस-या नंदीध्वजाला साज चढविण्यात आला होता. उत्तर कसब्यातील श्री मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठात सकाळी मानाच्या पहिल्या व दुस-या नंदीध्वजांची मानकरी शिवानंद हिरेहब्बू, राजशेखर हिरेहब्बू, राजशेखर देशमुख, सुदेश देशमुख यांच्यासह पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महापौर शोभा बनशेट्टी, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, उज्वलाताई शिंदे,आमदार प्रणिती शिंदे, स्मृति शिंदे, सिद्धेश्वर देवस्थान कमिटीचे चेअरमन धर्मराज काडादी, यांच्या हस्ते विधिवत पूजा करण्यात आली . 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com