शिक्षक समिती अखेर फुटली 

संतोष सिरसट
मंगळवार, 30 जानेवारी 2018

सोलापूर  - राज्याच्या प्राथमिक शिक्षकांचे प्रश्‍न मांडण्यामध्ये महत्त्वाची भूमिका घेणाऱ्या महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीमध्ये अखेर फूट पडली आहे. दुसऱ्या गटाचे नेते असलेले शिवाजीराव साखरे हे संघटनेच्या राजाध्यक्षपदी नियुक्त झाले असून, त्यांनी रविवारी (ता. 28) पुण्यात झालेल्या बैठकीमध्ये नव्या कार्यकारिणीची घोषणा केली आहे. 

समितीचे जानेवारी महिन्याच्या ओरोस येथे अधिवेशन झाले होते. त्या अधिवेशनामध्येच फुटीची बीजे रोवली गेली. समितीच्या राजाध्यक्षपदी उदय शिंदे यांची झालेली निवड ही लोकशाहीला धरून नसल्याचे सांगत लातूरच्या शिवाजीराव साखरे यांनी स्वत-ला राजाध्यक्ष म्हणून घोषित केले होते. याबाबत 8 जानेवारीच्या "सकाळ'मध्ये "राज्याच्या शिक्षक समितीमध्ये फूट?' या आशयाची बातमी प्रसिद्ध केली होती. हा अंदाज अखेर खरा ठरला. पुण्यातील बैठकीत साखरे यांनी नव्या कार्यकारिणीची निवड केली. या कार्यकारिणीत राज्याच्या सर्व प्रादेशिक विभागांना स्थान दिले असून, राज्यसचिव म्हणून नागपूरचे लीलाधर ठाकरे, कार्याध्यक्षपदी कोल्हापूरचे शंकर मनवाडकर, कोशाध्यक्षपदी सोलापूरचे राजाभाऊ राऊत, राज्य उपाध्यक्षपदी पुण्याचे गिरीश नाईकडे, राज्य संघटकपदी औरंगाबादचे के. सी. गाडेकर, कार्यालयीन चिटणीसपदी परभणीचे रामकिशन लटपटे तर संपर्कप्रमुखपदी परभणीचे वसंत घोगरे व प्रसिद्धी प्रमुखपदी रत्नागिरीचे जावेद शेख यांची नियुक्ती साखरे यांनी केली आहे. 

जरी नव्या कार्यकारिणीची घोषणा केली असली तरी अद्यापही आम्ही एक होऊ शकतो असा मला विश्‍वास आहे. त्यांना ज्या वेळी वेळ मिळेल, त्या वेळी चर्चेसाठी बसू. 
उदय शिंदे, राजाध्यक्ष, शिक्षक समिती.

Web Title: marathi news solapur teacher committee