मंगळवेढ्यात एका तरूणाचा संशयास्पद मृत्यू

हुकूम मुलाणी
शनिवार, 13 जानेवारी 2018

मंगळवेढा : भोसे येथील इंग्लिश स्कूल या शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन संपल्यानंतर रात्री घरी येत असताना रड्डे येथील माणिक नारायण सांगोलकर (वय 20) याचा अज्ञात कारणावरून संशयास्पद मृत्यू झाला असल्याची घटना उघडकीस आली आहे. रड्डे-भोसे रोडवरील बाळकृष्ण हॉटेलशेजारील विहिरीत माणिक सांगोलकर यांचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याने एकच खळबळ उडाली. सदर घटना मंगळवेढा तालुक्यातील रड्डे-भोसे रोडवर घडली असून सदर घटनेची फिर्याद हॉटेलचे मालक माऊली भाऊ बंडगर (रा. घेरडी रोड, बंडगर वस्ती नंदेश्वर) यांनी दाखल केली आहे. 

या फिर्यादित म्हटले आहे की, १२ जानेवारीला रात्री दीडच्या सुमारास आमच्या शेतातील विहिरीवर बॅटऱ्यांचा उजेड दिसला. म्हणून काय प्रकार घडला आहे हे पाहण्यासाठी हॉटेलमधील कामगार कुमार सुखदेव शिंदे याला घेऊन बॅटरीच्या उजेडात विहिरीत पाहिले असता एक अनोळखी पुरुषाचे प्रेत दिसून आले. तेथे बाजूला गुंगेवस्ती, भोसे येथील लोकांनी सांगितले की, विहिरीत पडलेल्या आणखी एका माणसाला गाडीत घालून दवाखान्यात घेऊन गेलेत असे सांगितले. हे रात्री एक ते दीडच्या सुमारास घडले असल्याचे सांगण्यात येत आहे. सदर घटनास्थळी ग्रामस्थांनी मोठया प्रमाणात गर्दी केली. माणिक हा लवंगीतील भैरवनाथ साखर कारखाना येथे कामाला होता. त्यांचा कुटुंबाचा उदरनिर्वाह हा माणिक वरच चालत असल्याने त्यांच्या ह्या संशायास्पद मृत्युने त्याच्या कुटुंबाचा आधार गेला आहे. घटनास्थळी पोलीस अधिकाऱ्यांनी भेट देऊन तपासकार्य सुरू केले आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूर येथील शासकीय रूग्णालयात पाठविण्यात आला असून शवविच्छेदनाच्या अहवालनंतर तपास केला जाणार असून यामध्ये कसलीही कसूर केली जाणार नाही, असे पोलीस निरीक्षक प्रभाकर मोरे यांनी सांगितले.

Web Title: Marathi news solpaur news young boy dies