भूमिपुत्र शेतकरी संघटनेच्या सात गावांमध्ये शाखा स्थापन

सनी सोनावळे
मंगळवार, 20 मार्च 2018

टाकळी ढोकेश्वर - पारनेर तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मुलांनी दीड वर्षापूर्वी शेतकरी प्रश्नांवर प्रभावीपणे काम करणारी बिगरराजकीय राज्यस्तरीय स्थापन केलेल्या भूमिपुत्र शेतकरी संघटनेला शेतकरी वर्गातुन मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत असुन, संघटनेच्या गावोगाव शाखा स्थापन करण्यात येत आहेत.

संघटनेच्या तालुक्यातील काळेवाडी, देसवडे, मांडवा, वडगाव सावताळ, नागापुर, ढोकी, खडकवाडी या सात गावांमध्ये एकाच दिवशी शाखांची 
स्थापना करण्यात आली. संघटनेचे प्रदेशाध्यक्ष संतोष वाडेकर, प्रदेश प्रवक्ते अनिल देठे, किरण वाबळे, अशोक आंधळे, सचिन सैद या कार्यकरणीच्या हस्ते शाखांचे उद्गाटन झाले. 

यावेळी वाडेकर म्हणाले की, शेतकऱ्यांच्या एक जुनच्या संपापासुन ते मुंबई येथील लाँग मार्च सह अन्य शेतकरी मोर्चामध्ये संघटनेने भरीव असे योगदान दिले असून, संघटना अल्पावधीतच नावारूपाला आली आहे. शेतकऱ्यांच्या मुलांनी संघटनेत सक्रीय होऊन शेतकरी बांधवांचे प्रश्न सोडवण्यासाठी पुढाकार घ्यावा.

अनिल देठे यांनी संघटनेच्या यशस्वी वाटचालीवर प्रकाश टाकताना संघटनेच्या दोन नेत्यांना राज्य सुकाणू समितीत काम करण्याची संधी मिळाल्याने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह, दुधदर, शेतकरी पेन्शन यांसारखे शेतकरी हिताचे प्रमुख मुद्दे सुकाणूच्या माध्यमातून सरकारदरबारी मांडता आले व काही प्रमाणात त्यावर यशस्वी तोडगाही काढता आल्याचे समाधान त्यांनी व्यक्त केले.

यावेळी गणेश चौधरी, संतोष कोरडे, रोहन आंधळे, नंदू साळवे, संजय भोर, ज्ञानेश्वर गागरे उपस्थित होते.

Web Title: marathi news takli dokeshwar farmers bhumiputra sanghatana