‘सर्व्हर डाउन’मध्ये अडकले शिक्षकांचे पगार

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 जानेवारी 2018

सोलापूर - राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे वेतन देण्यासाठी सरकारने ‘शालार्थ प्रणाली’ विकसित केली आहे. मात्र, मागील १० ते १५ दिवसांपासून या प्रणालीचे सर्व्हर डाउन झाल्यामुळे शिक्षकांच्या पगाराची माहिती भरली जात नाही. त्यामुळे राज्यातील प्राथमिक व माध्यमिक शिक्षकांचे जानेवारीचे वेतन मिळण्यात अडचणी निर्माण होणार आहेत. 

शिक्षकांचे वेतन ‘ऑफलाइन’ऐवजी ‘ऑनलाइन’ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. ऑफलाइन प्रणालीमुळे शिक्षकांचे वेतन होण्यास उशीर लागत असल्यामुळे ‘शालार्थ’ ही ऑनलाइन प्रणाली दोन-तीन वर्षांपासून सुरू केली. मात्र, त्याच्या सर्व्हरमध्ये बिघाड झाल्याने शिक्षकांचे जानेवारी महिन्याचे वेतन होणार नाही. शिक्षकांचे पगार नेहमीच उशिरा होतात, असा अनुभव आहे. यातच आता शालार्थ प्रणालीचे सर्व्हर बंद पडल्याने त्याचा परिणाम जानेवारी महिन्याच्या पगारावर होणार आहे.

दरम्यान, पुण्यातील येथील प्राथमिकचे शिक्षण उपसंचालक शरद गोसावी यांनी २९ जानेवारीला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात ‘ऑफलाइन’ पद्धतीने शिक्षकांचे वेतन काढण्यात येऊ नये, असे सांगितले आहे. राज्यातील शिक्षकांचे वेतन हे केवळ शालार्थ प्रणालीद्वारेच काढण्याचा आदेश त्यांनी दिला आहे.

Web Title: marathi news teacher payment solapur