एसटी उलटल्याने 12 प्रवासी जखमी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 2 फेब्रुवारी 2018

वैराग - बार्शी ते तुळजापूर रस्त्यावर गौडगाव येथे (ता. बार्शी) एसटी बस स्टिअरिंग जाम झाल्याने आज सकाळी उलटली. या अपघातात चालक, वाहकासह 12 प्रवासी जखमी झाले. त्यांना उपचारासाठी उस्मानाबादच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बार्शी आगाराची एसटी बस (एमएच 14 बीटी 2644) सकाळी साडेसहा वाजता तुळजापूरकडे रवाना झाली. गौडगावातील नागोबा चौकातील मंदिराजवळ आल्यानंतर बसचे स्टिअरिंग जाम झाल्याने ती रस्ता सोडून उलटली. या अपघातात बसचा चक्काचूर झाला.
वैराग - बार्शी-तुळजापूर रस्त्यावर गुरुवारी उलटलेली एसटी बस.
Web Title: marathi news vairag news western maharashtra news st bus accident passenger injured

टॅग्स