अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांची उडाली धांदल

राजेश पाटील
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

ढेबेवाडी (सातारा) : ढगाळ वातावरण व अधून मधून पावसाचा शिडकावा यामुळे आज सकाळपासून संपूर्ण ढेबेवाडी परीसरात शिवारांमध्ये शेतकऱ्यांची एकच धांदल उडाली आहे. ही धांदल काढणीस आलेल्या व काढणी करून ठेवलेल्या रब्बी हंगामातील हरबरा, पावटा आदी पिकांना वाचविण्यासाठी सुरु आहे.

सकाळपासून शेतकरी ताडपत्री व कागद घेवून शिवाराकडे धावत होते व काढणी करून शेतात पडलेले पिक गोळा करुन झाकून सुरक्षित ठेवताना दिसत होते. ढगाळ वातावरण व पावसाच्या शिडकाव्याचा आंब्याच्या मोहरावर विपरित परिनाम होण्याची भिती शेतकरी व्यक्त करीत आहेत. आंबा पिकानेच परिसरातील डोंगर भागातील अनेक कुटुंबांना मोठा हातभार दिला असून शेतकरी या हंगामावरच भिस्त ठेवून असतात. ढगाळ वातावरणामुळे हंगाम अडचणीत असल्याची चर्चा आहे.

Web Title: Marathi news western Maharashtra news unexpected rain farmers