वेटरची नसा कापून आत्महत्या

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 7 फेब्रुवारी 2018

कऱ्हाड - वेटर म्हणून काम करणाऱ्या युवकाने काल रात्री उशिरा येथे आत्महत्या केली. अशोक पवार (वय 37) असे संबधिताचे नाव आहे. येथील न्यायालयाच्या मागील बाजूस असलेल्या मोकळ्या जागेत त्याचा मृतदेह आढळून आला. काल रात्री त्याने फुटलेल्या बाटलीच्या काचेने हाताच्या नसा कापून घेतल्या. रात्रभर रक्तश्राव झाल्याने त्याचा मृत्यू झाला असावा, असा अंदाज व्यक्त होत आहे. 

अशोक याचे रत्नागिरी भागातील संगमेश्वर मुळगाव आहे. मात्र अनेक वर्षापासून तो नोकरी निमित्ताने येथे स्थायिक होता. अनेक वर्षे त्याने येथील पोष्ट ऑफिस समोरील हॉटेल वैष्णवीमध्ये वेटर म्हणून काम केले होते. काल रात्री त्याने येथील न्यायालयाच्या पाठीमागील पडीक जागेत त्याचा मृतदेह आढळला. ही माहिती मिळताच पोलिस त्वरीत घटनास्थळी तेथे पोहोचले. पंचनामा झाला. अशोकने स्वतःच्या हातावर बाटली फोडून नस कापून घेतल्याचे दिसून आले. सकाळी घटनास्थळी पोलिस पोहोचले. त्यावेळी त्यांनी वैष्णवी हॉटेलचे मालक वसंत देवाडीगा यांना बोलवून घेतले. त्यावेळी त्यांनी त्यास ओळखल्यानंतर त्याची ओळख पटली. अशोक अनेक दिवसांपासून आजारी होता. त्याला खोकल्याचा व दमाच्या आजार होता. त्यावर उपचार सुरु होते. मात्र त्याने अचानक आत्महत्या का केली याचे कारण समजू शकले नाही. अशोकने महिनाभरापूर्वीच श्री. देवाडीगा यांचे काम सोडले होते. त्यावेळी त्याने गावी जाणार असेही सांगितले होते. तीन ते चार दिवसापूर्वी त्याने श्री. देवाडीगा यांच्याकडून संगमेश्वरला घरी जाण्यास पैसेही घेतले होते. मात्र त्याने काल रात्री आत्महत्या केल्याचे आज स्पष्ट झाले.

Web Title: marathi news western maharashtra waiter suicide