राज्यपाल कोश्‍यारी यांच्या हस्ते पुरग्रस्त मुलींच्या लग्नासाठी मदत | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

bhagat singh koshyari

राज्यपाल कोश्‍यारी यांच्या हस्ते पुरग्रस्त मुलींच्या लग्नासाठी मदत

सांगली : राज्यपाल भगतसिंग कोश्‍यारी यांच्या उपस्थितीत दीपाली भोसले-सय्यद यांच्या चॅरिटेबल ट्रस्टने दत्तक घेतलेल्या एक हजार मुलींना प्रत्येकी ५० हजार रुपये ठेव पावत्यांचे वितरण गुरुवारी ( ता. ९) सकाळी ११ वाजता कवठेपिरान रस्त्यावरील दीपलक्ष्मी मंगल कार्यालयात होणार आहे. यावेळी प्रतिकात्मक सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातील पाच मलांनी राज्यपालांच्याहस्ते पावत्या वितरीत केल्या जातील, अशी माहिती ट्र्स्टच्या प्रमुख अभिनेत्री दीपाली भोसले-सय्यद यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री कपील पाटील, राज्याचे जलसंपदा तथा पालकमंत्री जयंत पाटील, शिवसेना नेते नितीन बानुगडे पाटील, खासदार श्रीकांत शिंदे, खासदार धैर्यंसिल माने, खासदार संजय पाटील यांच्या उपस्थितीत राहणार आहेत. या कामगिरीबद्दल वल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाल्याबद्दल राज्यपाल श्री. कोश्‍यारी यांच्याहस्ते अभिनेत्री भोसले-पाटील यांना गौरवण्यात येणार आहे.

हेही वाचा: कोकणात जाणाऱ्यांना दिलासा; 'RTPCR' ची बंधने हटवली

अभिनेत्री भोसले-सय्यद म्हणाल्या की, सन २०१९ मध्ये राज्यात आलेल्या महापुरात सांगली जिल्ह्यातील पूरग्रस्त भागातील १००० मुलींना त्यांच्या चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे दत्तक घेतले होते. विविध ४८ गावातील या मुली आहेत. त्यांच्या लग्नांच्या मदतीसाठी प्रत्येकी ५० हजार रुपयाची देण्याचे जाहिर केले होते. यासाठी गरीब कुटुंबातील मुलींच्या निवडी करण्यात आल्या होत्या. त्यातील १०० मुलींच्या लग्नावेळी यापुर्वीच प्रत्येकी ५० हजार रुपये दिले आहेत. गुरुवारी ( ता. ९) कोरोनामुळे गर्दी टाळण्यासाठी प्रतिकात्मक पाच विवाहित मुलींना ठेव पावत्या दिल्या जातील. अन्य १९५ जणींनी घरी प्रमाणपत्र पोहोच केली जाणार आहेत. जिल्ह्यासाठी ५ कोटी रुपये मदत दिली जाईल. यंदाच्या जुलैतील महापूरात घरे गमावलेल्यांसाठीही मदत देण्यात येणार आहे.

Web Title: Marriage Flood Hit Girls Help Hands Governor Bhagtsingh Koshyari Deepali Bhosale

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Sangli