हुतात्म्याच्या पुतळ्याची पारनेर तालुक्‍यात चोरी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 29 एप्रिल 2017

सुपे - कारगिल युद्धातील हुतात्मा अरुण बबन कुटे यांच्या वडनेर (ता. पारनेर) येथील स्मारकातून त्यांचा पंचधातूंचा पुतळा गुरुवारी (ता. 27) रात्री चोरांनी पळविला.

सुपे - कारगिल युद्धातील हुतात्मा अरुण बबन कुटे यांच्या वडनेर (ता. पारनेर) येथील स्मारकातून त्यांचा पंचधातूंचा पुतळा गुरुवारी (ता. 27) रात्री चोरांनी पळविला.

कारगिल युद्धात कुटे यांना वीरमरण आले होते. ग्रामस्थ व शहीद अरुण कुटे स्मृती प्रतिष्ठानातर्फे वडनेर येथे हुतात्मा कुटे यांचे स्मारक बांधण्यात आले. तेथे कुटे यांचा पंचधातूंचा पुतळा बसविण्यात आला. ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे, तत्कालीन पालकमंत्री बबनराव पाचपुते व आमदार विजय औटी यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण झाले. चोरांनी काल रात्री हा पुतळा पळवून नेला. त्यामुळे गावकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. याबाबत सुपे पोलिस ठाण्यात फिर्याद देणार असल्याचे वडनेरचे उपसरपंच राजू सोनुले यांनी सांगितले.

Web Title: martyr statue theft