

मशीद शेख कुस्ती स्पर्धेतील छायाचित्र
Sakal
जेऊर : बादोले (बु ), ता. अक्कलकोट येथील कुस्तीपटू मशीद रुकुम शेख यांनी पुणे येथे झालेल्या मातीप्रकारातील ८६ किलो वजनी गटातील महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले आणि २.५ लाख रुपये किंमतीचे बुलेट आणि पन्नास हजार रुपये रोख असे बक्षीस पटकावून आपल्या गावाचे आणि तालुक्याचे नाव उज्वल केले आहे. या यशाबद्दल तमाम कुस्ती शौकीनातून अभिनंदन केले जात आहे.