सांगली : महापौरांचा स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा

नवीन आठ सदस्य नियुक्त
सांगली : महापौरांचा स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा
Updated on

सांगली : महापौर दिग्विजय सूर्यवंशी (Mayor Digvijay Suryavanshi) यांनी आज स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला. गतवर्षी त्यांची राष्ट्रवादीकडून स्थायी समिती सदस्यपदी निवड करण्यात आली होती. मात्र फेब्रुवारीत झालेल्या निवडणुकीत ते महापौरपदी विजयी झाले. त्यामुळे त्यांनी आज आपल्या स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा सभापती पांडुरंग कोरे यांच्याकडे दिला.

स्थायी समिती सदस्यांच्या निवडी येत्या महासभेत होणार आहेत. यामध्ये काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे (congress NCP party) प्रत्येकी दोन तर भाजपचे चार सदस्य दोन वर्षांची मुदत पूर्ण झाल्याने बाहेर पडणार आहेत. त्यांच्या जागी नवीन आठ सदस्य नियुक्त करण्यात येणार आहेत.

सांगली : महापौरांचा स्थायी सदस्यत्वाचा राजीनामा
रत्नागिरी-नागपूर राष्ट्रीय महामार्गावर पिस्तुलाच्या धाकाने अपहरण

महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांना राष्ट्रवादीने गतवर्षी स्थायी समिती मध्ये संधी दिली होती. त्यानंतर फेब्रुवारी महापालिकेच्या महापौर उपमहापौर निवडी झाल्या. महापालिकेच्या उर्वरित भरतीसाठी महत्व खुल्या प्रवर्गासाठी राखीव झाले होते. त्यामुळे दिग्विजय सूर्यवंशी यांना राष्ट्रवादीने महापौर पदाच्या निवडणुकीत उतरवले. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने आघाडी करून भाजपमधील अंतर्गत बंडाळीचा फायदा उठवत महापालिकेतील भाजपची सत्ता संपुष्टात आणली आणि दिग्विजय सूर्यवंशी यांची महापौरपदी निवड झाली.

सूर्यवंशी हे महापौर झाल्याने ते स्थायी समिती सदस्य पदाचा राजीनामा देणारा हे अपेक्षित होतेच परंतु कोरोना महामारीच्या दुसऱ्या लाटेत त्यांनी स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा दिला नव्हता. आता ऑगस्टअखेर आठ सदस्यांची मुदत संपत असल्याने नवीन सदस्य आणि सभापती निवड होणार आहे. या निवडी येत्या महासभेत होणार आहेत. तत्पूर्वीच सूर्यवंशी यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा आज स्थायी समिती सभापतीकडे पाठवून दिला. त्यांनी एक वर्षातच सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे त्यांच्या जागी पुढचा एक वर्षासाठी आणखी एका राष्ट्रवादीच्या सदस्याला संधी मिळणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com