राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून  जेवण-शिधा देण्याचा उपक्रम 

RSS.jpg
RSS.jpg

सांगली- राष्ट्रीय स्वंयसेवक संघ आणि राष्ट्रीय संघटन मंडळाने "कोरोना' च्या संकटकाळात बेघर, स्थलांतर करताना परप्रांतीय, भिकारी आदींना जेवण देण्याचा सामाजिक उपक्रम सुरु केला आहे. पहिल्या दिवशी 200 जेवणाच्या पाकिटांचे वाटप करण्यात आले. 


राष्ट्रीय स्वयंसेवक संघ संकट काळात नेहमीच मदतीसाठी पुढे असतो. महापुरात हजारो पूरग्रस्तांना जेवण दिले. तसेच जीवनावश्‍यक वस्तूंचे कीट दिले. सध्या जगात "कोरोना' चे सावट पसरले आहे. संचारबंदी लागू केल्यामुळे निराधार, बेघर लोक उपाशी आहेत. त्यांच्यासाठी पाच पोळ्या, भाजी, लोणचे, चटणी असे दोनवेळेला पुरेल इतके जेवणाचे पॅकेट दिले जात आहे. तसेच रोजंदारीवरील लोकांना "लॉक डाऊन' मुळे घरीच बसून राहावे लागत आहे. त्यांच्या उदरनिर्वाहासाठी पाच किलो आटा, पाच किलो तांदूळ, एक किलो डाळ अशी शिधा दिली जात आहे. 


संचारबंदीच्या काळात महापालिका प्रशासन आणि राष्ट्रीय संघटन मंडळाने केलेल्या सर्व्हेक्षणात सांगली मिरज परिसरात 321बेघर, अनाथ लोक आढळले आहेत. त्यांच्यासह सांगलीत अडकलेले परप्रांतीय कामगारांना शिधा दिला जात आहे. सांगलीतील खरे मंगल कार्यालय आणि मिरजेतील रंगशारदा याठिकाणी संकलन केंद्र सुरु करण्यात आले. तेथून लोकांना जागेवरच जावून पॅकेट दिले जाते. 


"लॉकडाऊन' मुळे अडचणीत सापडलेल्या व्यक्तींसाठी हा उपक्रम राबवणेत येत आहे. जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने बेघर, अनाथ, अपंग, एकाकी, ज्येष्ठ नागरिक, निराधार, रोजगारावर जगणारे, अत्यंत गरीब अशा विविध गरजूंचे सर्वेक्षण केले आहे. त्यानंतर मदतीची गरज असेलेले निश्‍चित केले आहे. त्यांच्यापर्यंत जेवणाची पाकिटे आणि शिधा वितरणाची तयारी केली आहे. योजनेसाठी जो खर्च येईल त्यासाठी तातडीने निधी उभारणेची गरज आहे. या उपक्रमात आर्थिक मदत करावी. तसेच मोठ्या प्रमाणात तेल, तांदूळ, गव्हाचे पीठ आदी मदतीसाठी जनकल्याण समितीच्या राजवाडा चौकातील कार्यालयात संपर्क साधावा असे आवाहन केले आहे. 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com