विचारवंतांच्या हत्येतील सूत्रधारांना शोधा - मेधा पाटकर

विचारवंतांच्या हत्येतील सूत्रधारांना शोधा - मेधा पाटकर

कोल्हापूर -अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे अध्यक्ष नरेंद्र दाभोलकर, ॲड. गोविंद पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्यांचा तपास तडीला नेऊन पडद्यामागील सूत्रधारांनाही शोधून कठोर शिक्षा करावी, अशा मागणीचे निवेदन ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांनी निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांच्याकडे दिले. जनआंदोलनाच्या राष्ट्रीय समन्वय संविधान सन्मान यात्रेनिमित्त त्या कोल्हापुरात आल्या होत्या. 

निवेदनात म्हटले आहे, की देशात व राज्यातही विकासाच्या नावावर वेगवेगळे प्रकल्प राबविण्यासाठी जे निर्णय घेतले जातात, त्यापैकी अनेक निर्णय भांडवलदारांच्या तसेच बहुराष्ट्रीय कंपन्यांच्या हिताचे आणि देशाच्या नैसर्गिक संसाधनाच्या लुटीला मुक्तद्वार देणारे असे आहेत. त्यामुळे हे निर्णय रद्द करावेत, चालू वर्षी जागतिक पर्यावरणदिनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच भाषणात नैसर्गिक संसाधनाची जपणूक व शाश्‍वत विकासाचे महत्त्व अधोरेखित करणारे वक्तव्य केले. पण, प्रत्यक्षात अनेक पर्यावरणीय नियम व कायदे निश्‍चित केले जातात. किंवा बदलण्यात येतात, हा प्रकार थांबवावा. कोकणात जे विनाशकारी प्रकल्प जनमताला न जुमानता आणण्याचा प्रयत्न होत आहे, या सर्व बाबी संविधानाशी विसंगत असल्याने अशा प्रकारची आगळिक करणाऱ्या व्यक्ती, संघटना, पंथ यांच्यावर कारवाई व्हावी, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

मेघा पानसरे, प्रसाद कुलकर्णी, सुनीती सु. र., बी. एल. बरगे, सतीशचंद्र कांबळे, व्यंकाप्पा भोसले, हसन देसाई, सुंदरराव देसाई, वसंतराव पाटील, पूनम कनोजिया, उदय कुलकर्णी, दशरथ पारेकर आदी उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com