गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवरील हल्ल्याचा मिडियाने बाऊ केला : हार्दिक पटेल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 ऑक्टोबर 2018

कऱ्हाड : गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवर होत असलेल्या हल्ल्याचा मिडियाने बाऊ केला असल्याचा आरोप गुजरातच्या पटेल समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी केला. सांगली जिल्ह्यातील आरेवाडी येथे कार्यक्रमास ते जाणार आहेत. काल रात्री ते कऱ्हाडमध्ये आले. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. कऱ्हाडात पटेल यांचे त्यांच्या समर्थकांनी जोरदार स्वागत करण्यात आले.

''देशात आत्ताची स्थिती फारच वाईट आहे, असे सांगून श्री. पटेल म्हणाले, देशात शेतकरी आत्महत्या करत आहे. हे अत्यंत वाईट आहे. आरक्षणासह अन्य मागण्यांसाठी सामान्यांना रस्त्यावर उतरावे लागत आहे. स्वातंत्र्यानंतरच्या सत्तर वर्षानंतरही अशी विदारक स्थिती आहे. मग यापेक्षा ब्रिटीश काळातील स्थिती फारच चांगली होती.'', असे म्हणावे लागेल. केवळ घोषणा करून विकास होत नाही.

''गुजरातमध्ये हिंदी भाषिकांवर अन्याय होत आहे.'' असे विचारल्यावर श्री. पटेल यांनी ते धुडकावून लावले. ते म्हणाले, ''या सर्व चर्चेच खापर टी. व्ही. माध्यमांवर जास्त दाखवला गेला मात्र, त्याबाबतची एकही क्लीप नाही किंवा पुरावा नाही. अजूनही गुजरातमध्ये सर्वांचा आदरच होतो. हिंदी भाषिकांचाही होतोच आहे. हिंदी भाषाही बोलली जात आहे. मात्र एखाद्या घटनेवरून सगळ्यांनाच दोषी ठरवल जाचय हे चुकीच आहे.''आपण कुणालाही समर्थन देणार नसल्याचं सांगून त्यांनी मी सरकारच्या विरोधात आहे काँग्रेस किंवा भाजपाच्या बाजूचा नसल्याचही त्यांनी स्पष्ट केले. 

Web Title: Media made issue of attacked on Hindi speaking people in Gujarat: Hardik Patel