मेडिकल प्रवेशाची संधी यंदापासून धरणार ग्राह्य 

शीतलकुमार कांबळे - सकाळ वृत्तसेवा 
मंगळवार, 7 फेब्रुवारी 2017

सोलापूर - मेडिकल प्रवेशासाठी आवश्‍यक असणारी नीट परीक्षा तीन वेळाच देण्याची मर्यादा 31 जानेवारी रोजी घालण्यात आली होती. हा नियम 2017 पासून लागू करण्यात यावा, असा आदेश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने दिला आहे, या आशयाचे परिपत्रक सीबीएसईने प्रसिद्ध केले आहे. 

सोलापूर - मेडिकल प्रवेशासाठी आवश्‍यक असणारी नीट परीक्षा तीन वेळाच देण्याची मर्यादा 31 जानेवारी रोजी घालण्यात आली होती. हा नियम 2017 पासून लागू करण्यात यावा, असा आदेश मेडिकल कौन्सिल ऑफ इंडियाने दिला आहे, या आशयाचे परिपत्रक सीबीएसईने प्रसिद्ध केले आहे. 

एआयपीएमटी (ऑल इंडिया प्री मेडिकल टेस्ट) व नीट (नॅशनल इलिजिबिलिटी कम एन्ट्रन्स टेस्ट) यापूर्वी काही विद्यार्थ्यांनी दिली होती. ही परीक्षा तीन वेळा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी नव्या मर्यादेची धास्ती घेतली होती, तर काहींच्या एक किंवा दोन परीक्षा देऊन झाल्या होत्या. या नियमामुळे अनेक विद्यार्थ्यांचे डॉक्‍टर बनण्याचे स्वप्न भंगणार होते. विद्यार्थ्यांच्या या प्रश्‍नावर तोडगा एमसीआयने (मेडिकल कौन्सिल ऑफ इंडिया) काढला आहे. 2017 पासून होणाऱ्या नीट परीक्षेस पहिली संधी म्हणून ग्राह्य धरले जाणार आहे. त्यामुळे एक किंवा त्याहून अधिकवेळा प्रवेश परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांनासुद्धा यापुढे सलग तीन वेळा परीक्षा देण्याची संधी मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी यापूर्वी तीन वेळा मेडिकल प्रवेश परीक्षा दिली आहे, आता ते विद्यार्थीसुद्धा नीट परीक्षेसाठी अर्ज करू शकतात, असे परिपत्रकात नमूद केले आहे. मेडिकल व डेंटल (वैद्यकीय व दंतवैद्यकशास्त्र) अभ्यासक्रम प्रवेशासाठी नीट परीक्षेच्या आधी एआयपीएमटी परीक्षा घेतली जात होती. या परीक्षेऐवजी आता नीट परीक्षा घेतली जात आहे. ही परीक्षा दिलेल्या विद्यार्थ्यांना देशातील सरकारी, खासगी तसेच अभिमत विद्यापीठातील मेडिकल प्रवेश गुणवत्तेनुसार देण्यात येणार आहेत. या प्रवेशासंदर्भात मर्यादा घातल्याने अनेक विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केली होती. आता या नियमात शिथिलता आणल्याने विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. 

Web Title: Medical admission opportunities