माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी हाती घेतले सर्वरोग निदान शिबीरासारखे उपक्रम

माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे यांनी हाती घेतले सर्वरोग निदान शिबीरासारखे उपक्रम

मोहोळ- शिक्षण आणि वैद्यकीय सेवा महाग झाल्यामुळे सर्वसामान्य लोकांची गैरसोय होत आहे. तर वर्षातून एकदा आरोग्याची सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी सर्वरोग निदान शिबीरा सारखे उपक्रम माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे राबवित आहेत. ज्यांना तज्ञ डॉक्टरांकडे जाता येत नाही त्यांच्याकडेच या डॉक्टर्सना घेऊन येणे हे लोककल्याणाचे काम असल्याचे प्रतिपादन काशी पीठाचे डॉ. चंद्रशेखर शिवाचार्य स्वामी यांनी केले.

वाघोली ता. मोहोळ येथील महात्मा फुले सूतगिरणी व शाहू शिक्षण संस्थेच्या संयुक्त विद्यमाने कामती बुद्रुक येथील देशमुख प्रशालेत सर्वरोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी मेंदू रोगतज्ञ डॉ. आनंद मूदकणा होते. यावेळी व्यासपीठावर मंद्रुप पिठाचे रेणुक शिवाचार्य महाराज, माजी मंत्री प्रा. लक्ष्मण ढोबळे, शाहू शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्राहम आवळे, सुतगिरणीच्या अध्यक्षा पुष्पाताई कांबळे, उपाध्यक्षा मनीषाताई कांबळे, प्रकल्प सल्लागार समिती अध्यक्ष अभिजित ढोबळे, नंदू हवनाळे, नेत्रतज्ञ डॉ. उमा प्रधान, डॉ. गणेश इंदुरकर, सिव्हिल सर्जन डॉ. सुमेद  अंदुरकर, मोहोळ ग्रामीण रुग्णालयाचे अधिक्षक डॉ. पी. पी गायकवाड, नेत्र तज्ञ डॉ. असिफ  हरणमारे, डॉ. नदाफ, प्राथमिक आरोग्य केंद्र कामतीचे डॉ. महादेव हरकुट, विशाल बंडगर, शिवानंद भडंगे, डॉ. अमित मोटे, डॉ. प्रविण खारे उपस्थित होते.

यावेळी बोलताना प्रा. ढोबळे म्हणाले, वेगवेगळ्या रसायनयुक्त उत्पादन व त्याच्या सेवनाने रोग उदभवत आहेत. क्रयशक्ती वाढल्याने महागडी जीवनशैली आली आहे. तरुणांनी दारू, गुटखा, मटका, धूम्रपान या विषापासून दूर रहावे. शुद्ध पाणी व सात्विक आहार घ्यावा. मुलांच्या मातांनी आरोग्याकडे लक्ष द्यावे असे आवाहन केले. या शिबिरात मेंदू रोग तज्ञ, दंतरोग तज्ञ, स्त्रीरोगतज्ञ, नेत्ररोग तज्ञ, बालरोगतज्ञ यांच्याकडे तपासणी करून त्यांना आवश्यक त्या औषधांचे व चष्म्यांचे वाटप करण्यात आले. सूतगिरणीचे संचालक दिलीप तेलंग, शिवाजी साठे, संगप्पा दोडमणी, अभिषेक कांबळे, रावसाहेब कांबळे, आदी उपस्थित होते.

हे शिबीर यशस्वी करण्यासाठी जनरल मॅनेजर गंगाधर कुडल, श्रीमंत बिराजदार, शिवानंद म्हमाणे, यांच्यासह कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले यावेळी विविध तज्ञ मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त करून प्रा. ढोबळे यांच्या सामाजिक उपक्रमाचे   कौतुक केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रमोद कोरे व सुनीता पुळजे यांनी केले तर आभार गंगाधर कुडल यांनी मानले.

या शिबिरात 5420 रुग्णांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 1022 रुग्णांना मोफत नंबरच्या चष्म्याचे वाटप करण्यात आले. तसेच दोनशे रुग्णांच्या तपासणीत मोतीबिंदु आढळून आल्याने त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यासाठी त्यांना पुणे येथे नेण्यात येणार असून तेथे त्यांच्यावर मोफत शस्त्रक्रिया करण्यात येणार आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com