सोलापूरच्या सुरक्षेसाठी सज्ज आहेत 'मीरा, कायरा, रुबी आणि माया!' 

solapur
solapur

सोलापूर : आपलं शहर सुरक्षित राहावं यासाठी ऑन ड्यूटी 24 तास दक्ष असणाऱ्या पोलिस दलात डॉग स्कॉडची भूमिका महत्त्वाची आहे. पोलिस आयुक्तालयाच्या बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि गुन्हे शाखा पथकाकडे डॉग स्कॉड कार्यरत आहे. 

सोलापुरात बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि गुन्हे शाखा यांची दोन श्‍वान पथके आहेत. बॉम्ब शोधक व नाशक पथकामध्ये सव्वा वर्षाची मीरा, तीन वर्षांची माया, गुन्हे शाखेच्या पथकामध्ये पाच वर्षांची रुबी, चार वर्षांची कायरा यांचा समावेश आहे. या श्‍वानांना पुण्यातील तज्ज्ञांनी प्रशिक्षण दिले आहे. 

उन्हाळ्यात गारवा आणि ताक 
उन्हामुळे माणसं हैराण झाली आहेत. उकाड्यामुळे श्‍वानांना त्रास होऊ नये म्हणून उन्हाळ्यात पिण्यासाठी ताक दिले जात आहे. श्‍वानांना रॉयल कॅरल फूड दिले जात आहे. श्‍वानांना उकाड्यामुळे त्रास होऊ नये म्हणून गुरुनानक चौकातील बॉम्ब शोधक व नाशक पथकाच्या कार्यालयात दोन कूलर बसविण्यात आले आहेत. 

प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती 
या श्‍वानांना सांभाळण्यासाठी आठ प्रशिक्षित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहर पोलिसांच्या दोन्ही श्‍वान पथकांमध्ये पोलिस नाईक अभिजित देशमुख, पोलिस शिपाई सुदर्शन गुंड, पोलिस नाईक अमोल बादल, पोलिस नाईक अमोल बाइल, पोलिस नाईक सुधाकर जिडगीकर, पोलिस हवालदार संतोष आळंद, पोलिस शिपाई अरुण इप्माल, पोलिस हवालदार संतोष गवंडी, श्री. दोरनाल यांचा समावेश आहे. 

चोवीस तास सज्ज 
गोल्ड मेडल मिळवलेली मीरा श्‍वान स्फोटक वस्तू शोधण्यात तरबेज आहे. दिवसा-रात्री कोणत्याही क्षणी एखाद्या घटनेची माहिती कळाल्यास तत्काळ श्‍वान पथक तपास करण्यासाठी आहे. या सर्वच श्‍वानांची दर महिन्याला पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांकडून तपासणी केली जाते. दर तीन महिन्याला लसीकरण केले जाते. पोलिस विभागाच्या सर्व परेडमध्ये, शासकीय कार्यक्रमात या श्‍वानांचा सहभाग असतो. निवृत्तीनंतर या श्‍वानांना वरिष्ठ कार्यालयाच्या मान्यतेने इच्छुकांना सांभाळ करण्यासाठी दिले जाते. 

पोलिस प्रशासनाच्या तपास कार्यात श्‍वान पथकाची भूमिका अतिशय महत्त्वाची आहे. बॉम्ब असल्याच्या संशयित ठिकाणी श्‍वानांच्या माध्यमातून तपासणी केली जाते. चोरी, खून किंवा गुन्हा घडलेल्या ठिकाणीही श्‍वान पथकाला पाचारण केले जाते. 
- नितीन पवार, सहायक पोलिस निरीक्षक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com