प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या मोबदल्याबाबत मंत्र्यांसोबत 24 ऑक्‍टोबरला बैठक

solapur
solapur

सोलापूर : रत्नागिरी ते नागपूर व विजापूर ते गुहागर महामार्गासाठी सोलापूर व सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या जमिनी अधिग्रहीत केल्या जात आहेत. शेतकऱ्यांना योग्य मोबदला मिळावा या मागणीसाठी किसान सभेच्यावतीने आज सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या सोलापुरातील निवासस्थानासमोर तब्बल अडीच तास ठिय्या आंदोलन करण्यात आले. शेतकऱ्यांचे प्रश्‍न सोडविण्यासाठी 24 ऑक्‍टोबरला मंत्रालयात बैठक घेण्याचे आश्‍वासन मिळाले असल्याची माहिती सरचिटणीस डॉ. अजित नवले यांनी दिली. 

या बैठकीला सांगलीचे पालकमंत्री सुभाष देशमुख, सोलापूरचे पालकमंत्री विजयकुमार देशमुख, महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील, जलसंपदामंत्री गिरीश महाजन यांच्यासह संबंधित मंत्री, अधिकारी उपस्थित राहणार आहेत. मिरज तालुक्‍यातील अंकली येथून शेतकऱ्यांचा मोर्चा सहकारमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानाकडे आला. सांगली व सोलापूर जिल्ह्यातील बाधित गावांमधील शेतकऱ्यांना घेऊन शेतकऱ्यांचा जत्था आज सकाळी सोलापुरात आला. शेतकऱ्यांच्या आंदोलन पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सहकारमंत्री देशमुख यांच्या निवासस्थानासमोर व मार्गावर मोठा पोलिस बंदोबस्त लावला होता. लावलेला बंदोबस्त भेदत शेतकऱ्यांनी सहकारमंत्री देशमुख घरावर धडक मारली. त्यांच्या घरासमोर तब्बल अडीच तास ठिय्या मांडला. या वेळी कोशाध्यक्ष उमेश देशमुख, डॉ. सुदर्शन घेरडे, दिगंबर कांबळे, एम. एच. शेख आदी उपस्थित होते. 

लाठीचार्ज झाल्याचा दावा 
मोर्चाचे आज सकाळी 11 च्या सुमारास सोलापुरात आगमन झाले. मोर्चाचे आगमन झाल्यानंतर पत्रकार भवन, महिला हॉस्पिटल व सहकारमंत्री देशमुख यांच्या घरासमोर शेतकऱ्यांना अडविण्यात आले. शेतकऱ्यांचे अडवणूक करत असताना पोलिसांनी लाठीचार्ज केला, त्यामध्ये डॉ. घेरडे यांना पोलिसांकडून मारहाण झाली, डॉ. नवले यांचे कपडे फाडल्याचा दावा किसान सभेच्या पदाधिकाऱ्यांनी केला. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com