नेवासे पोलिस ठाण्यात गणेश मंडळातील कार्यकर्त्यांची बैठक

Meetings of the Ganesh Mandal workers in Nevase police station
Meetings of the Ganesh Mandal workers in Nevase police station

नेवासे : येणारा गणेशोत्सव शांततेत व उत्साहाच्या वातावरणात साजरा करा. मात्र तरुण मंडळांनी नियमाचे पालन करावे, अन्यथा बेशिस्त वागणाऱ्या मंडळावर कारवाई करणार असल्याचा इशारा सहाय्यक पोलिस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे यांनी केले. गणेशोत्सवात डीजे लावणाऱ्या मंडळावर कारवाई केली जाणार असल्याचेही त्यांनी यावेळी बोलताना स्पष्ट केले.

गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर जिल्हा पोलिस अधीक्षक रंजनकुमार शर्मा यांच्या आदेशाने नेवासे पोलिस ठाण्यात रविवार (ता. 2) ला घेण्यात आलेल्या गणेश मंडळातील कार्यकर्त्यांच्या बैठकीत मार्गदर्शन करतांना पोलीस निरीक्षक डॉ. शरद गोर्डे म्हणाले की, गणेशोत्सव काळात कार्यकर्त्यांनी एकमेकांशी वाद घालणे टाळावे, हीच अपेक्षा आपल्याकडून राहील. रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही यासाठी रस्त्यावर मंडप उभे करू नका. मंडळांनी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास चांगले राहील. गणेश मंडळाच्या मागील बाजूस जुगार खेळताना आढळल्यास त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला. जेथे गणेशाची स्थापना मंडळ करणार आहे त्या खाजगी जागेच्या मालकाचे संमती पत्र इतर ठिकाणी असल्यास नगरपंचायतची परवानगी घ्यावी, अशा सूचना त्यांनी केल्या.
     
दहा दिवसांच्या गणेशोत्सव काळात मंडळाच्या कार्यकर्त्यांनी आपल्या सदस्यांची नावे मोबाईल नंबर असा चार्ट तयार करावा,मिरवणुकीत विद्युत वाहिनीला अडथळा होणार नाही, असाच सेट वाहनांच्या गाडीवर असावा, प्रत्येक मंडळाच्या कार्यकर्त्यावर लक्ष ठेवणे ही देखील जबाबदारी त्या मंडळाच्या अध्यक्षावर राहील, मंडळाच्या कार्यकर्त्यांना नियमांचे पालन करतांना स्वैराचाराने वागू नये, प्रत्येक मंडळाच्या गणेश मूर्तीच्या रक्षणासाठी स्वयंसेवक असावा, गणपतीच्या निघणाऱ्या मिरवणुकीत लेझीम झांज पथक सादर करणाऱ्या मंडळाला सादरीकरण करण्यासाठी मोहिनीराज मंदिर चौकात अर्धा तास दिला जाईल, असा ही निर्णय घेण्यात आला.
   
यावेळी भाजपचे जिल्हा चिटणीस नितीन दिनकर, काँग्रेस कमिटीचे शहराध्यक्ष संजय सुखधान, शांतता कमिटीचे सदस्य भाऊसाहेब गंधारे, नगरसेवक राजेंद्र मापारी, सुधीर चव्हाण, सुहास पठाडे, अभिषेक गाडेकर, शांतवन खंडागळे, विल्यम गायकवाड, अल्तमश पठाण, मंडळाचे कार्यकर्ते स्वप्नील मापारी, वैभव दुधे, सागर पडूंरे, श्रावण रेनिवाल सोमेश मापारी, मंगेश दुधे, स्वप्नील कडपे, आण्णा जाधव, अभिषेक सुपेकर यांच्या सह मंडळाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com