आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती रद्द करावी - गोपीचंद पडळकर 

नागेश गायकवाड
मंगळवार, 11 डिसेंबर 2018

आटपाडी - धनगर आरक्षणासाठी समाजाकडून आंदोलने सुरु आहेत. शासनाकडूनही याबाबत हालचाली सूरू आहेत. तेव्हा आरक्षणाची अंमलबजावणी होत नाही तोपर्यंत मेगाभरती रद्द करावी अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. 

धनगर समाजाचे नेते उत्तमराव जानकर आणी गोपीचंद पडळकर आणि श्री.जानकर यांनी सरकारकडे निवेदन देऊन मागणी केली आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न निकाली लागत नाही तोपर्यंत महाराष्ट्रात राज्य व केंद्र सरकारची कोणतीही भरतीचे आदेश काढू नये. 1 ऑगस्टपासुन धनगर समाजाच्या प्रश्नावरती आंदोलने सूरू आहेत. पुण्यातील मेळाव्यानंतर औरंगाबाद, आरेवाडी येथे समाजचे मेळावे घेतले. 

ते म्हणाले, 'उपेक्षित धनगर समाजाला डावलुन राज्य सरकार येत्या काही दिवसांत मेगा भरती होऊ घालत आहे. जोपर्यंत आम्हाला एसटीच्या आरक्षणासोबत समाजाच्या मानाने सुधारीत आरक्षणाची टक्केवारी भेटत नाही तोपर्यंत सरकारने मेगाभरती रद्द करावी. भरती केल्यास समाजातील तरूणांना संधी मिळणार नाही. आरक्षणासाठी हालचाली सूरू आहेत. ते मिळेल असा आशावाद आहे.'

Web Title: Mega job recruitment should be canceled till the reservation is implemented - Gopichand Padalkar