Mehboob Shaikh : प्रश्न सोडविण्यात भाजप अपयशी; मेहबूब शेख

शरद युवा संवाद यात्रेची इस्लामपुरात सभा; लक्ष विचलित करण्याचा डाव
mehboob shaikh ncp criticize bjp over inflation and unemployment politics
mehboob shaikh ncp criticize bjp over inflation and unemployment politicssakal

इस्लामपूर : भाजप महागाई, रोजगारासारखे प्रश्न सोडविण्यात अपयशी ठरला असून, लोकांचे लक्ष विचलित करण्यासाठी ते भावनिक मुद्दे पुढे करून लोकांची डोकी भडकावीत आहेत, असा आरोप राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख यांनी केला. निवडणूक कोणतीही असो, भाजपला चितपट करण्यासाठी सज्ज राहा, असे आवाहनही त्यांनी केले.

येथे शरद युवा संवाद यात्रेच्या २९५ व्या सभेत ते बोलत होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून मेहबूब शेख यांनी ही यात्रा सुरू केली आहे. प्रतीक पाटील, अरुण आसबे, जिल्हाध्यक्ष विराज नाईक, तालुकाध्यक्ष संग्राम जाधव, कार्याध्यक्ष देवराज देशमुख, इस्लामपूर शहराध्यक्ष सचिन कोळी, कार्याध्यक्ष स्वरूप मोरे प्रमुख उपस्थित होते.

मेहबूब शेख म्हणाले, ‘‘ज्येष्ठ नेते शरद पवार हे छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू-फुले-आंबेडकर यांचे विचार पुढे नेत असल्याने काही जण त्यांच्यावर जातीयवादाचा आरोप करीत आहेत. त्यांनी देशात प्रथम मंडल आयोग लागू करून ओबीसींना २७ टक्के आरक्षण दिले. हिंजवडी येथे आशियातील सर्वांत देखणा आयटी पार्क उभा करून मुलांना नोकऱ्या उपलब्ध केल्या. येत्या २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत अध्यक्ष पवार यांना राज्यात सर्वाधिक मतांनी विजयी करा.’’

प्रतीक पाटील म्हणाले, ‘‘शरद संवाद यात्रा संघटनेस ताकद देणारी आहे. कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त वेळ देऊन काम करावे. यातूनच आपणास लोकांचे बळ मिळेल.’’ विराज नाईक म्हणाले, ‘‘ग्रामपंचायत निवडणुकीत आपण चांगले यश मिळविले. येत्या जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपालिका निवडणुकीस सज्ज राहा. वाळवा तालुक्यात संघटना मजबूत आहे.’’

यावेळी नेर्ले सरपंच संजय पाटील, जक्राईवाडीचे सरपंच दिग्विजय माने, फारणेवाडीचे सरपंच मनोहर फारणे, बोरगावचे उपसरपंच सचिन पाटील, बावचीचे उपसरपंच नितीन पाटील, कुंडलवाडीचे उपसरपंच आसिफ पटेल यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे विजयराव पाटील, बाळासाहेब पाटील, शहाजी पाटील यांच्यासह राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते उपस्थित होते. ‘युवक’चे तालुकाध्यक्ष संग्राम जाधव यांनी स्वागत केले. विनायक जगताप यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष डॉ. संदीप पाटील यांनी आभार मानले

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com