संख्याबळाच्या कसोटीवर 'येथे' भाजपची "विकेट' 

संख्याबळाच्या कसोटीवर 'येथे' भाजपची "विकेट' 
Updated on

कऱ्हाड : पालिकेच्या विषय समित्यांचे सभापती, सदस्य निवडीवर जनशक्ती आघाडीचे वर्चस्व कायम राहिले आहे. मात्र, पालिकेतील आघाड्यांच्या नोंदणीकृत बलाबलाच्या संख्येमुळे स्थायी समिती सदस्य निवडीच्या खेळात लोकशाही "प्लस' ठरली आहे. मात्र, भाजपला त्याचा फटका बसला आहे. जनशक्ती आघाडीचे वर्चस्व सिद्ध होतानाच लोकशाही आघाडीने बाजी मारत स्थायी समितीत "एन्ट्री' केली आहे. त्यामुळे पालिकेतील राजकारणाला वेगळे वळण मिळाले असून, संख्याबळाच्या खेळीने भाजपची "विकेट' पडली आहे. 

"जनशक्ती'चे समित्यांवर वचर्स्व 

पालिकेच्या सहा विषय समित्या, त्यांच्या सभापती व स्थायी समितीच्या सदस्यांच्या निवडी सभागृहात पार पडल्या. त्यावेळी पीठासन अधिकारी रवी पवार यांनी नगरपालिका कायद्यानुसारच्या निर्णयामुळे राजकीय वातावरण बदलले आहे. समित्यांच्या सर्वच सभापतिपदांवर "जनशक्ती'चा वरचष्मा कायम राहिला आहे. समित्यांवर "जनशक्ती'चे वचर्स्व आहे.

महिला व बालकल्याण समितीवर स्मिता हुलवान तर नियोजनवर विजय वाटेगावकर यांची सभापती म्हणून फेरनिवड झाली आहे. बांधकाम सभापतिपदावर नवखे किरण पाटील, आरोग्य सभापतिपदी महेश कांबळे, पाणीपुरवठा सभापतिपदी श्रीमती आशा मुळे यांची निवड झाली आहे. त्यांच्यावर दाखवलेला विश्वास त्यांच्या आघाडीतील मतभेदांवर औषध ठरला आहे. त्यामुळे त्यांच्यातील वादावरही पडदा पडला आहे. त्यांच्या आघाडींतर्गत सलोख्याचेच त्यातून दर्शन झाले.

हेही वाचा -  भात नको...आम्हाला अंडी द्या ! विद्यार्थ्यांची मागणी 

पीठासन अधिकाऱ्यांनी संख्याबळाच्या आधारवर घेतलेल्या निर्णयामुळे स्थायी समितीतून भाजपचे सदस्य मात्र बाहेर गेले आहेत. सलग दोन वेळा समिती सदस्य म्हणून ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर निवडून जात होते. मात्र, नोंदणीकृत आघाडीतील संख्याबळ गृहित धरण्यात आल्याने त्याचा भाजपला फटका बसून, त्यांची "विकेट' गेली. त्यामुळे त्यांना त्या समितीतून "आउट' व्हावे लागले.

जरुर वाचा - अन् वर्गमित्र धावून आले पवार कुटुंबियांच्या मदतीला

स्थायी समितीच्या नगराध्यक्षा पदसिद्ध अध्यक्ष आहेत. त्यामुळे भाजपच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे एकट्याच समितीत राहिल्या आहेत. पीठासन अधिकाऱ्यांच्या नोंदणीकृत संख्याबळाचा फायदा लोकशाही आघाडीला होवून गटनेते सौरभ पाटील यांची स्थायी समितीत "एन्ट्री' झाली आहे. संख्याबळाच्या निकषाने राजकीय समीकरणही बदलले आहे. "जनशक्ती'तर्फे गटनेते राजेंद्र यादव व माजी नगराध्यक्षा श्रीमती शारदा जाधव यांना नियुक्त केले आहे.

मागील वर्षी झालेल्या निवडीवेळी संख्याबळानुसार स्थायीमध्ये आमचा सदस्य घेतला पाहिजे, अशी मागणी मागील वर्षी लोकशाहीचे गटनेते सौरभ पाटील यांनी केली होती. ती संधी त्यांना यंदाच्या पीठासन अधिकाऱ्यांनी घेतलेल्या निर्णयामुळे चालून आली आहे. त्यामुळे गटनेते पाटील यांच्या जबाबदारीत वाढ झाली आहे. स्थायीच्या निवडीत भाजप बाहेर फेकले गेले असले तरी त्यांची पुढची खेळी काय राहणार, याकडेही लक्ष लागून आहे. 


अखेर निवडी जाहीर... 

पीठासन अधिकारी श्री. पवार यांनी निर्णय घेतानाच त्या निर्णायाला भाजपने जोरदार विरोध केला. ज्येष्ठ नगरसेवक विनायक पावसकर, फारूक पटवेकर यांनी कायदेशीर बाजू मांडत कायद्याचा खिस काढला. मात्र, पीठासन अधिकारी यांनी आपण विभागीय आयुक्तांकडे अपील दाखल करू शकता. तो मार्ग आपल्याला मोकळा आहे, असे स्पष्ट करत स्थायीच्या निवडी जाहीर केल्या. 

हेही वाचा -  Video : येथे आजही अंधश्रध्‍देचा कहरच...

असे आहे कराड पालिकेचे संख्याबळ 

जनशक्ती आघाडी - 16 सदस्य.
लाेकशाही आघाडी - सहा सदस्य. 
भाजप - चार सदस्य व नगराध्यक्ष ( एकूण पाच).
अपक्ष - तीन.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com