esakal | व्हॉट्‌सॲपवरील त्या मेसेजमुळे मोडले तिचे लग्न...
sakal

बोलून बातमी शोधा

message on whatsapp and her marriage brokers sangli marathi news

मुहूर्तमेढ रोवली होती...हळदी लागल्या होत्या...आदल्या रात्री मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता. इतक्‍यात आला निरोप..

व्हॉट्‌सॲपवरील त्या मेसेजमुळे मोडले तिचे लग्न...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

इस्लामपूर (कोल्हापूर) : मुहूर्तमेढ रोवली होती...हळदी लागल्या होत्या...आदल्या रात्री मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता. बुधवारी म्हणजे आज (ता. ११) दुपारी साडे बाराचा विवाहाचा मुहूर्त होता. घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. इतक्‍यात नवऱ्या मुलाकडून लग्न मोडल्याचा निरोप आला आणि सर्वांच्या आनंदावर विरजण पडले. 

इतक्‍या अनपेक्षित धक्‍क्‍याने मुलीचे आई-वडील कोलमडले. घरात सर्वत्र स्मशानकळा पसरली. लग्न मोडण्याचे कारण होणाऱ्या नव वधूच्या मित्राने दोघांचे फोटो तिच्या होणाऱ्या नवऱ्याला पाठविले होते. या घटनेने दोन्ही कुटुंबावर नको तो प्रसंग गुदरला. 

हेही वाचा- कोऱ्या कागदावर घेतल्या सह्या.... अन् गमवावा लागला त्याला जीव...

साखरपुडा, याद्या झाल्या, मुहूर्तमेढ रोवली ​पण

याबाबत ‘त्या’ युवतीने आज इस्लामपूर पोलिस ठाण्यात तिच्या बरोबरचे फोटो तिच्या होणाऱ्या पतीला पाठविणाऱ्या ‘त्या’ अनोळखी युवकाविरुद्ध फिर्याद दिली आहे. इस्लामपूर शहराच्या एका उपनगरात राहणारी ही महाविद्यालयीन युवती तिचा विवाह पलूस येथील युवकाशी ठरला होता. साखरपुडा, याद्या झाल्या, मुहूर्तमेढ रोवली होती. लग्नाच्या आदल्या रात्री मंगळवारी (ता. १०) मेहंदीचा कार्यक्रम सुरू होता आणि सर्वांच्या आनंदावर विरजण टाकणारा तो मॅसेज नवरी मुलीच्या भावांच्या मोबाइलवरसुद्धा आला. इतक्‍यात तिच्या होणाऱ्या सासरकडूनही लग्न मोडल्याचा निरोप आला आणि लग्नघरात स्मशानकळा पसरली. 

हेही वाचा-पोलिसाला थप्पड मारने त्याला पडले महागात....

मी कधीही पाहिलेले नाही​

इस्लामपूर पोलिसात संबंधित युवतीने दिलेल्या फिर्यादीत अज्ञात व्यक्तीने त्याच्या मोबाइलवरून माझा भाऊ व होणारा पती यांच्या व्हॉटस्‌ॲपवर दोघांचे गळ्यात गळा घातलेले व अश्‍लील फोटो पाठविले आहेत आणि पतीला पाठविलेल्या फोटो सोबत जी. एफ. आहे, अक्षय  कोण आहे विचार तिला, पाहिले का भावा, म्हणून गडबडीत लग्न झाले असा मॅसेज पाठविला आहे. या फोटो मधील व्यक्तीस मी कधीही पाहिलेले नाही आणि मी त्याला ओळखतही नाही अशा आशयाची फिर्याद दिली आहे. पोलिसांनी त्याच्या मोबाइल नंबरवरून त्याचा शोध सुरू केला आहे.

loading image
go to top