sakal

बोलून बातमी शोधा

debt consolidation loan case in kodoli kolhapur marathi news

कर्जवसुलीच्या तगाद्याने आवळीतील एकाचा मृत्यू..ग्रामस्थांचे मृतदेह कोडोली पोलिस ठाण्यासमोर ठेवून आंदोलन...

कोऱ्या कागदावर घेतल्या सह्या.... अन् गमवावा लागला त्याला जीव...

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

कोडोली (कोल्हापूर) : मायक्रो फायनान्स व पतसंस्थेकडून न घेतलेल्या कर्जाच्या वसुलीचा तगादा सहन न झाल्याने आवळी (ता. पन्हाळा) येथील एकाचा मृत्यू झाला. एकनाथ धोडी पाटील (वय ६०) असे त्यांचे नाव. वसुलीस आलेल्या अधिकाऱ्याविरुद्ध तत्काळ कारवाई करावी, यासाठी गावातील नागरिकांनी मृतदेह कोडोली पोलिस ठाण्यात आणून ठिय्या मांडला.

पोलिसांनी कारवाई सुरू केली.  याबाबतची फिर्याद एकनाथ यांची मुलगी सुप्रिया बाळासो पाटील यांनी पोलिसांत दिली.
कोडोली पोलिस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, बचत गटात सभासद करून घेतो, असे अमिष दाखवून आवळी येथील एका महिलेने नंदा एकनाथ पाटील यांच्या कोऱ्या कागदावर सह्या घेवून कर्ज घेतले होते. दोन फायनान्स कंपन्या व एका पतसंस्थेकडून कर्जाची रक्कम बचत गटाच्या प्रमुख महिलेने हडप केल्याचा आरोप पाटील यांच्या नातेवाईकांनी केला.

हेही वाचा- कुणकेश्‍वर ग्रामस्थांचा होळीतून पर्यावरणाचा हा संदेश

 घाबरुन हृदयविकाराचा आला झटका ​

आपल्या नावावर  कर्ज काढल्याची माहिती एकनाथ पाटील यांना  नव्हती.एकनाथ पाटील व कुटुंबीय  वसुलीस येणाऱ्यास आम्ही कर्ज घेतलेच नाही, असे सागंत होते.  तरीही वसूल अधिकारी यांनी न जुमनता कर्जाच्या वसूलीचा तगादा लावला होता.  वसूलीचा तगादा सहन न झाल्याने मंगळवारी रात्री एकनाथ यांना हृदयविकाराचा झटका आला होता. त्यांना उपचारासाठी कोडोली येथील रुग्णालयात आणले होते. परंतु त्यांची परिस्थिती नाजूक असलेने कोल्हापूर जिल्हा रुग्णालयात हलविणेत आले परंतु उपचारा दरम्यान आज सकाळी त्यांचा मृत्यू झाला. 

हेही वाचा- सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेला यासाठी लिम्का बुकचे प्रमाणपत्र

कायदेशीर कारवाईची भूमिका
आवळी गावातील नागरीकांनी पाटील यांचा मृतदेह बुधवार सायंकाळी सहाच्या सुमारास कोडोली पोलिस ठाण्याच्या अंगणात ठेवत कारवाईसाठी ठिय्या मांडला. यावेळी संबधितावर कारवाई केली जाईल मृतदेहाचे हेलसांड करू नका, असे सहायक पोलिस निरीक्षक सुरज बनसोंडे यांनी सागूनही नागरीकांनी ऐकले नाही. अखेर शाहूवाडी विभागाचे पोलिस उपअधिक्षक अनिल कदम यांनी फिर्याद दया गुन्हा दाखल करतो व कायदेशीर कारवाई करतो, अशी भूमिका घेत जमावाला 
शांत केले. 

go to top