माणदेशी बॅंकेला राष्ट्रीय दर्जा देण्याचे ध्येय - चेतना सिन्हा

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 9 फेब्रुवारी 2018

म्हसवड - माणदेशी महिला बॅंकेस राष्ट्रीय पातळीवरील दर्जा प्राप्त करण्याचे ध्येय असून या कामी माणदेशी माणसांची सदिच्छा हवी आहे, असे आवाहन येथील माणदेशी महिला बॅंक व माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले.

म्हसवड - माणदेशी महिला बॅंकेस राष्ट्रीय पातळीवरील दर्जा प्राप्त करण्याचे ध्येय असून या कामी माणदेशी माणसांची सदिच्छा हवी आहे, असे आवाहन येथील माणदेशी महिला बॅंक व माणदेशी फाउंडेशनच्या अध्यक्षा चेतना सिन्हा यांनी केले.

दावोस (स्विझर्लंड) येथील जागतिक स्तरावरील आर्थिक विचार मंच परिषदेत (वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम) सहअध्यक्षपदाची जबाबदारी यशस्वीपणे सांभाळल्याबद्दल येथे श्रीमती सिन्हा यांचा सत्कार करण्यात आला. त्यावेळी त्या बोलत होत्या. प्रत्येक जण जन्माने नव्हे तर कर्मानेच मोठा होतो. माझा जन्म गुजरात राज्यात झाला. परंतु, कर्म माणदेशी ग्रामीण भागातील अशिक्षित महिलाच्यांसोबतीने केले. त्यांच्या व्यथा व समस्या जाणून घेतल्या. त्यांना मदतीचा हात देण्यासाठी माणदेशी फाउंडेशनची स्थापना केली. त्यामाध्यमाने महिलांना आधार देण्याचा प्रयत्न केला. 

आर्थिक सबलीकरणासाठी माणदेशी महिला बॅंक उभारण्यास याच महिलांची प्रेरणा मिळाली. माणदेशी महिला बॅंकेने ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक सबलीकरण व माणदेशी फाउंडेशनच्या माध्यमाने प्रामुख्याने ग्रामीण भागात झालेल्या लोकोपयोगी कामांची दखल घेऊन जागतिक आर्थिक परिषदेच्या सहअध्यक्षपदाची संधी मिळाली, हे सर्व श्रेय माणदेशी महिलांचेच आहे.’’ 
दावोस येथील परिषदेमुळे जगात माणदेशी बॅंक व माणदेशी फाउंडेशनची ओळख झाली आहे. त्यामुळेच माणदेशी महिला बॅंकेस राष्ट्रीय बॅंकेचा दर्जा प्राप्त करण्याबाबत ध्येय आहे, असेही त्यांनी नमूद केले.

गुंतवणुकीला प्रतिसाद
दावोस येथील जागतिक आर्थिक परिषदेत महिला उद्योजिकांसाठी आर्थिक गुंतवणुकीबाबत केलेल्या आवाहनास प्रतिसाद मिळाला असून पहिल्याच टप्प्यात १०० कोटी रुपयांचा फंड माणदेशी महिला बॅंकेस मिळाला आहे. त्यामुळे महिला बॅंकेत सुमारे २५० कोटींच्या ठेवी झाल्या आहेत.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या अध्यक्षा खिस्टीन लगार्ड या माणदेशी महिला बॅंकेस भेट देण्यास म्हसवडला येणार असून त्याही माणदेशीत गुंतवणूक करणार आहेत.

Web Title: mhaswad news mandeshi bank nationalise chetana sinha

टॅग्स