विद्यार्थ्यांच्या खिचडीत खंड नको 

mid day meal
mid day meal

सोलापूर : राज्यातील पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना शालेय पोषण आहार दिला जातो. यासाठी लागणाऱ्या धान्यादी मालाचा पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराची मुदत संपली आहे. त्यामुळे धान्यादी माल संपल्याचे सांगून विद्यार्थ्यांना खिचडी न देण्याचे धोरण शाळा अवलंबण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. त्यामुळे शिक्षण विभागाने डिसेंबर महिन्यात स्थानिक पातळीवर धान्यादी मालाची खरेदी करुन खिचडी नियमितपणे देण्याच्या सूचना दिल्या आहेत. 

सकाळचे मोबाईल अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यासाठी क्लिक करा
विद्यार्थ्यांना देण्यात येणाऱ्या शालेय पोषण आहारात 2017-18 या वर्षात धान्यादी मालाची पुरवठा करणाऱ्या ठेकेदाराची मुदत 30 नोव्हेंबरला संपत आहे. पुढील वर्षासाठी जिल्हानिहाय पुरवठादार नियुक्तीची प्रक्रिया सुरु आहे. त्यामुळे एक ते 31 डिसेंबर या कालावधीत शाळांना धान्यादी माल मिळणार नाही. तेव्हा स्थानिक पातळीवर शाळांनी धान्यादी मालाची खरेदी करुन विद्यार्थ्यांना पोषण आहाराचा पुरवठा करायचा आहे. पुरवठादार नव्याने निश्‍चित करण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने डिसेंबर व जानेवारी या दोन महिन्याची धान्यादी मालाची मागणी द्यायची नाही. ज्यांनी ती मागणी दिली आहे, ती परत घेण्याच्या सूचना शिक्षण विभागाने दिल्या आहेत.

डिसेंबर महिन्यासाठी लागणाऱ्या तांदळाची मागणी तयार करुन ठेवावी. भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून तांदूळ उचलून तो शाळास्तरावर पोच करण्याची व्यवस्था केली जाईल. शाळेमध्ये शिल्लक असलेला धान्यसाठा संपल्यानंतर पोषण आहाराचा पुरवठा करणारी यंत्रणा धान्यादी मालाची खरेदी करुन आहाराचा पुरवठा करण्यास तयार असल्यास पोषण आहाराचे काम त्याच यंत्रणेकडे ठेवावे. त्यांनी आहार देण्यास नकार दिल्यास शाळा व्यवस्थापन समितीने धान्यादी मालाची खरेदी करुन स्वयंपाकी तथा मदतनीस यांच्याकडून आहार शिजवून घ्यावा. त्यांनीही नकार दिल्यास समितीने गावातील दुसऱ्या बचत गटाकडून पोषण आहार शिजवून घेण्याची व्यवस्था करायची आहे. 

समितीच्या खात्यावर पैसे 
डिसेंबर महिन्यासाठी खरेदी करायच्या धान्यादी मालाचे पैसे शाळा व्यवस्थापन समितीच्या खात्यावर दिले जातील. धान्यादी मालाची खरेदी करुन चांगल्या प्रतिचा आहार दिला जातो की नाही हे पाहण्याची जबाबदारी मुख्याध्यापक व शाळा व्यवस्थापन समितीची आहे, असेही प्राथमिकचे शिक्षण संचालक सुनील चौहान यांनी शिक्षणाधिकाऱ्यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com