#MilkAgitation जिगरबाज पोलिसांनी राखली दुध टॅंकरची बुज

हेमंत पवार
बुधवार, 18 जुलै 2018

३०० वर पोलिस २४ तास ऑन ड्युटी ः शहरातील सकाळचा दुध पुरवठा सुरळीत  

कऱ्हाड: सातारा जिल्ह्यातील जनता झोपेत असताना जिल्हा पोलिस दलातील ३०० हुन अधिक जवान मात्र रात्रभर मुसळधार पावसात पुणे-बेंगळुरु महामार्गासह अन्य मार्गावर गस्त घालून मंत्र्यांसारखे दुध टॅंकरना सुरक्षा देत टॅंकर मुंबईकडे रवाना करत होते. शहरवासियांना दुध मिळावे या बांधीलकीतून त्यांनी रात्रीचा दिवस करत दोन दिवसापासुन बंदोबस्ताचा तान असतानाही सुरक्षेची बुज राखल्यानेच शहरात सकाळचा दुध पुरवठा झाला.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेने दुधाला प्रतिलीटर पाच रुपये वाढवुन मिळावे या मागणीसाठी कालपासून दुधदराचे आंदोलन सुरु झाले आहे. त्यासाठी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी, कार्यकर्त्यांनी गावोगावी रान उठवत जनजागृती केली आहे. त्याला शेतकरी आणि गावोगावच्या दुध संस्थाकडुनही चांगला प्रतिसाद मिळाला आहे. काल अनेक गावातील शेतकऱ्यांनी स्वतःहुन दुध डेअरीस दुध घातले नाही. त्यातच अनेक संघांनीही दुध संकलन काल बंद ठेवले होते. त्यामुळे शहराला दुध पुरवठा होणार की नाही, याबाबत साशंकता व्यक्त होत होती. मात्र, कोणत्या परिस्थितीत दुध पुरवठा सुरु राहिला पाहिजे, या शासनाच्या सुचनेप्रमाणे पोलिसांनी त्यासाठीची जबाबदारी स्विकारुन कार्यवाही सुरु केली आहे.

दोन दिवसापासून जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरु आहे. त्याचा सामना करत काल रात्रभर पोलिसांनी पोलिस अधिक्षक संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली दुध टॅंकरना जागता पहारा दिला. जिल्ह्यातील जनतेला आज (बुधवार) सकाळी दुध पुरवठा व्हावा यासाठी जिल्हा पोलिस दलाचे ३०० हुन अधिक पोलिस कर्मचारी व अधिकारी २४ तास ऑन ड्युटी होते. त्यांच्याव्दारे रात्रभर मुसळधार पावसातही पुणे-बेंगळुरु महामार्गासह अन्य मार्गावर गस्त घालून टॅंकर मुंबईकडे रवाना करण्यात येत होते. अनेक ठिकाणी महामार्गावर पोलिसांनी पॉईंट करुन कर्मचारी तैनात केले आहेत.

Web Title: milk agitation issue and satara district police security milk tanker