हे दूध संघवाल्यांचे आंदोलन - रघुनाथदादा पाटील

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 जुलै 2018

सांगली : दूध बंद आंदोलन हे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे दिसत असले तरी ते वास्तवात दूध संघवाल्यांचे आहे. त्यांच्याकडून दूध पावडरचे दूध करून बाजारात विकले जात आहे. जोवर पावडर संपत नाही तोवर आंदोलन सुरु राहील. यात राजू शेट्टींना हाताशी धरून शेतकऱ्यांशी खेळ केला जातोय, राज्याच्या तिजोरीवर दरोडा टाकण्याचाच हा डाव आहे, अशी जोरदार टीका शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांनी "सकाळ'शी बोलताना केली. 

ते म्हणाले, "उसाची एफआरपी शंभर टक्के एकरकमी मागण्याऐवजी ती 80 टक्के चालेल, अशी तडजोड करणारे राजू शेट्टी दुधाचे आंदोलन करताहेत. तेही संघवाले आहेत. हे संघांचे आंदोलन आहे. पूर्वी संघ एक दिवसाचा खाडा (दूध बंद) करायचे. शेतकरी त्यावर नाराज व्हायचे. मी नऊ वर्षे दूध संघाचा संचालक होतो, सारे डाव मला माहिती आहेत. आता शेतकरी नाराजही झाला नाही पाहिजे आणि आपला डावही साधला पाहिजे, असा खेळ केला आहे. शहाण्या शेतकऱ्यांनी त्याला बळी पडू नये.'' 

...तर भाजप सरकार 
आणायची जबाबदारी माझी 

ते म्हणाले, "हा प्रश्‍न केवळ दुधापुरता उरलेला नाही. टोमॅटो रस्त्यावर ओतायची वेळ आली. तूर रस्त्यावर ओतली गेली. देशात शेतमाल हा गरजेपेक्षा जास्त पिकू लागला आहे, दूधाचेही तेच आहे. त्यामुळे सन 1957 च्या जीवनावश्‍यक वस्तू कायद्यातून शेतमाल वगळावा, सारे प्रश्‍न झटक्‍यात सुटतील. दुसऱ्या बाजूला गोवंश हत्याबंदी कायदा केला आहे. भाकड, कमी दूध देणाऱ्या गायीसुद्धा पाळाव्या लागत आहेत. त्याचाही परिणाम दूध उत्पादन वाढीवर होतोय. या दोन सूचना भाजपने अंमलात आणल्या तर देशात, राज्यात पुन्हा भाजप सरकार आणायची जबाबदारी माझी. 
ते म्हणाले, "राजू शेट्टी लिटरला 27 रुपये दर मागत नाहीत. ते पाच रुपये अनुदान मागताहेत. हे पैसे संघवालेच खाणार आहेत. कुणाचे किती दूध आहे, याची यादी कुणाकडे आहे का? हा सरकारच्या तिजोरीवर दरोडा असेल आणि त्यासाठी सारे मिळून खाण्याचा डाव रचला गेला आहे. भाजप देशाला लुटतेय, शिवसेना मुंबई लुटतेय आणि या सरकारला आतून बाहेरून पाठींबा देऊन राष्ट्रवादी, कॉंग्रेसवाले त्यात वाटेकरी झाले आहेत. लूट केवळ शेतकऱ्यांची होतेय.'' 

Web Title: milk agitation is of milk union said raghunath dada patil