दूध उत्पादकांना रोज कोटीचा फायदा

विकास जाधव
मंगळवार, 7 ऑगस्ट 2018

काशीळ - जिल्ह्यात गाईचे दैनंदिन २० लाख लिटर दूध संकलन होत आहे. राज्य शासनाने दुधास लिटरमागे पाच रुपये वाढ केल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादकांना प्रतिदिनी एक कोटी रुपये जादा मिळू लागले आहेत. या दरवाढीतून शेतकऱ्यांना दिलासा मिळणार असून, धोक्‍यात आलेला दूध व्यवसाय पुन्हा उभा राहण्यास मदत होणार आहे. 

दुधाचे दर १८ ते २१ रुपये लिटर कमी झाल्याने जिल्ह्यातील दूध उत्पादक शेतकरी अडचणीत आला होता. ऐन उन्हाळ्यात दूध दराची ही अवस्था तर पावसाळ्यात कसे होईल, या भीतीने अनेक शेतकऱ्यांना दुभती जनावरे विकावी लागली होती. मिळत असलेल्या दरात भांडवली खर्चही निघत नसल्याने दूध उत्पादक व्यवसाय तोट्यात चालवत होते. दूध दरवाढीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना व शेतकऱ्यांनी दूध दरवाढीसाठी जागोजागी आंदोलने केली होती. सातारा जिल्ह्यातही या आंदोलनास मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळाला होता. आंदोलनाच्या काळात एकूण दुधापैकी दहा ते ११ टक्के दुधाचे संकलन होत होते. या आंदोलनाची दखल घेत राज्य शासनाने प्रति लिटर पाच रुपयाने वाढ करत लिटरला २५ रुपये दर देण्याचा अध्यादेश काढण्यात आला होता. या अध्यादेशाप्रमाणे एक ऑगस्टपासून नवीन दरवाढ लागू करण्यात आली आहे. 

जिल्ह्यात सुमारे ६९ लहान-मोठ्या संस्थांकडून दुधाचे संकलन होते. त्यामध्ये सहा सहकारी, पाच मल्टिस्टेट तर ५७ खासगी संस्थांचा सहभाग आहे. २३ लाख लिटरवर दैनंदिन दूध संकलन केले जाते. त्यामध्ये गाईचे सुमारे २० लाख लिटर दूध संकलित होते. या दुधास प्रतिलिटर पाच रुपयाने वाढ केली असल्याने दैनंदिन एक कोटीचा जादा लाभ मिळणार आहे. सध्या जिल्ह्यात दुधाचे संकलन सुरळीत सुरू आहे. वाढलेल्या दरामुळे किमान तोटा तरी होणार नसल्याने शेतकऱ्यांत समाधान व्यक्त होत आहे. या दरवाढीमुळे आर्थिक संकटात सापडलेल्या दूध व्यवसाय उभा राहण्यास मदत होणार आहे.

Web Title: Milk Producer profit