दूध उत्पादक शेतकऱ्यांचे रास्तारोको आंदोलन

हुकूम मुलाणी
सोमवार, 30 एप्रिल 2018

मंगळवेढा (सोलापूर) : गाईच्या दूधाला किमान 28 व म्हशीच्या दूधाला 50 रुपये दर मिळावा या प्रमुख  मागणीसाठी आज तालुक्यातील आंधळगाव येथे काॅंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

मंगळवेढा (सोलापूर) : गाईच्या दूधाला किमान 28 व म्हशीच्या दूधाला 50 रुपये दर मिळावा या प्रमुख  मागणीसाठी आज तालुक्यातील आंधळगाव येथे काॅंग्रेसचे विधानसभा अध्यक्ष नितीन नागणे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी व दूध उत्पादक शेतकऱ्यांनी रास्तारोको आंदोलन केले.

सुमारे दोन तासातील रास्ता रोकोमुळे कोल्हापूर – मंगळवेढा महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली . दोन्ही बाजूला पाच किलोमीटर अंतरापर्यंत वाहनांच्या रांगा लागल्याने बाहेरगावला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल झाले. आंदोलक आपल्या मागण्यांवर ठाम राहिल्याने पोलिसांची मोठी तारांबळ उडाली दोन तासानंतर नायब तहसीलदार गणेश लव्हे यांनी आंदोलनस्थळी येऊन मागण्यांचे निवेदन स्विकारल्यानंतर आंदोलनकांनी आंदोलन मागे घेतले.

यावेळी आ.भारत भालके, महिला तालुका अध्यक्षा निकीता पाटील, दत्ता टापरे, शिवाजी देशमुख, शरद रोंगे,  मिलिंद भोसले, संतोष पाटील, हिंमत आसबे, अनिल चव्हाण,गोविंद भोसले, धर्मा मोरे, दत्ता सावंत, उत्तम भूसे, विवेक खिलारे,सचिन आकळे, मनोज चव्हाण, किसन सावंजी,जितेंद्र लेंडवे, ज्ञानेश्वर डोंगरे, रतन पाटील,दिपक दिघेसोमनाथ आरे ,अनिल वाघमोडे ,दिलीप जाधव,राजाराम गायकवाड आदींसह शेतकरी सहभागी झाले. येत्या आठ दिवसांत दूध दर प्रश्नी सरकारने तोडगा काढावा अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा अध्यक्ष नितीन नागणे यांनी दिला.

मागील काही दिवसांपासून दूधाचे भाव कोसळल्यामुळे दूध उत्पादक शेतकरी कमालीचे हैराण झाले आहे. दूधा पेक्षा पशुखाद्याचे भाव दुपटी तिपटीने वाढल्याने दूध धंदा तोटयात आला आहे. दुष्काळी भागातील शेतकर्यांचा दूध व्यवसाय कोलमडल्याने अनेक गरीब शेतकर्यांचे प्रपंच धोक्यात आले आहेत. गाईच्या दूधाला प्रती 28 रुपये, म्हशीच्या दूधाला 50 रुपये दर मिळावा, पशुखाद्याचे भाव नियंत्रणात आणावेत, कर्नाटक राज्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात दूधाला प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्यावे, दूध पावडर निर्यातीस परवानगी द्यावी,भेसळयुक्त दूधावर कारवाई करावी यासह इतर प्रमुख मागण्यांसाठी काॅंग्रेसच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकर्यांनी रस्त्यावर उतरुन सरकार विरोधी आपला रोष व्यक्त केला. यावेळी शेतकरी व कार्यकर्त्यांनी सरकारच्या चूकीच्या धोरणा विरोधात जोरदार घोषणी बाजी करत निषेध नोंदवला.

आंदोलनादरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडूनये यासाठी मंगळेवढा तालुका पोलिस निरीक्षक प्रभाकर मोरे यांच्या मार्गदर्शानाखाली मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

काल मंगळवेढा युवक काॅग्रेसचे अध्यक्ष युवराज शिंदे व महेश दत्तु यांनी काॅग्रेस कार्यकर्तेला सोबत घेवून याच प्रश्नांवर आंदोलन केले आणि आजही याच प्रश्नांवर विधानसभा अध्यक्ष यांनी कार्यकर्तेला सोबत घेवून आंदोलन केले.पण ही गटबाजी भविष्यात काॅग्रेसलाच धोकादायक ठरू नये म्हणजे झाले अशी निष्ठावानखेडे काॅग्रेस कार्यकर्तेमधून होत आहे.

Web Title: milk production business man on rastaroko agitation