दूध आंदोलन पेटले 

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 18 जुलै 2018

कोल्हापूर - पहाटे पहाटे दूध संस्थांची आणि संघांची दूध संकलन करण्यासाठी धावपळ, ठराविक शेतकऱ्यांनीच याला दिलेला प्रतिसाद आणि संकलन केलेल्या दूध वाहनांवर हल्लाबोल करणाऱ्या कार्यकर्त्यांची बेधडक भूमिका यामुळे दूध आंदोलनाचा दुसरा दिवसही धगधगणारा ठरला. 

सरूड (ता. शाहूवाडी) येथे रस्त्यावर दूध ओतले; तर इचलकरंजी येथे पैलवानांना दूध वाटप करण्यात आले. रात्री आठच्या सुमारास सातारा येथील खंबाटकी घाटात गोकुळच्या 19 टॅंकरवर कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करत टॅंकरचे नुकसान केले. 

कोल्हापूर - पहाटे पहाटे दूध संस्थांची आणि संघांची दूध संकलन करण्यासाठी धावपळ, ठराविक शेतकऱ्यांनीच याला दिलेला प्रतिसाद आणि संकलन केलेल्या दूध वाहनांवर हल्लाबोल करणाऱ्या कार्यकर्त्यांची बेधडक भूमिका यामुळे दूध आंदोलनाचा दुसरा दिवसही धगधगणारा ठरला. 

सरूड (ता. शाहूवाडी) येथे रस्त्यावर दूध ओतले; तर इचलकरंजी येथे पैलवानांना दूध वाटप करण्यात आले. रात्री आठच्या सुमारास सातारा येथील खंबाटकी घाटात गोकुळच्या 19 टॅंकरवर कोल्हापूरच्या कार्यकर्त्यांनी तुफान दगडफेक करत टॅंकरचे नुकसान केले. 

गायीच्या दुधाला प्रतिलिटर पाच रुपयांचे अनुदान मिळावे यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने राज्यभर आंदोलन पुकारले आहे. याला प्रतिसाद मिळत आहे. कालपासून सुरू झालेल्या आंदोलामध्ये अनेक दूध संस्था आणि संघांनी सहभाग घेतला. आज दुसऱ्या दिवशी मात्र दुधाचे संकलन करण्याचा निर्णय गोकुळसह इतर काही संघांनी घेतला. दूध संकलन करण्यासाठी दूध संस्था आणि संघांना पहाटेच ही मोहीम राबवावी लागली. गोकुळ, वारणासह अन्य दूध संघाचे संकलन केले. रोज संकलन होणाऱ्या सुमारे 16 लाख लिटरपैकी आज केवळ 7 लाख लिटरच दूध संकलन झाले आहे. हातकणंगले, शिरोळ तालुक्‍यातील अनेक गावांतील दूध संस्थांनी मंगळवारी सकाळपासूनच दूध संकलन बंद केल्याने शेतकऱ्यांनी दूध घरातच ठेवणे पसंत केले. शाहूवाडी सरुड (ता. शाहूवाडी), मुडशिंगी (ता. करवीर) येथे टॅंकर अडवून दूध रस्त्यावर ओतण्याचा प्रयत्न केला. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी शेतकऱ्यांकडून दूध घेऊन विविध ठिकाणी त्याचे मोफत वाटप केले. वृद्धाश्रम, शाळेतही दूध वाटप करून वेगळे चित्र निर्माण केले. इचलकरंजीतील पैलवान, गरजू नागरिकांना दुधाचे वाटप करण्यात आले. शाहूवाडी तालुक्‍यात स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन तीव्र केले. सरूड येथे तीन टॅंकर अडवून एक हजारहून अधिक लिटर दूध रस्त्यावर ओतून दिले. संघटनेच्या वतीने सरकारच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. कोल्हापूर जिल्हा दूध संघांच्या (गोकुळ) संघाने करवीर तालुक्‍यातील बहुतांशी गावातून दुधाचे संकलन केल्याचा दावा केला आहे. हातकणंगले, शिरोळ, कागल, राधानगरी तालुक्‍यातील संकलनात मोठी घट झाली आहे. दूध आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर शिरोळ तालुक्‍यात पोलिसांनी मोठा बंदोबस्त ठेवला आहे. स्वाभिमानीच्या प्रत्येक कार्यकर्त्याला पकडून त्यांना गुन्हेगारासारखी वागणूक मिळत असल्याचा आरोप स्वाभिमानीच्या वतीने करण्यात आला आहे. अनेक दूध संघांनी आवाहन करूनही शेतकऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दूध संस्थेला दूध घातले नाही. यामुळे दूध संस्थांचे संकलन बंद राहिले. विशेषकरून ज्या भागात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्राबल्य आहे, त्या गावांमध्ये दूध संकलन शंभर टक्के बंद राहिले. 

बंदोबस्तात मुंबईकडे काही वाहने रवाना 
कार्यकर्ते रस्त्यावर थांबून असल्याने दूध वाहतूक करणाऱ्या वाहनांनीही धोका पत्करून वाहने गावांमध्ये नेली नाहीत. दूध संघांच्या प्रतिनिधींनी दिलेल्या माहितीनुसार मंगळवारी प्रत्येक संघांचे 20 ते 25 टक्केच दूध सकाळच्या सत्रात संकलित करण्यात आले. काही वाहने पोलिस बंदोबस्तात मुंबईकडे रवाना केली असली तरी ते प्रमाण खूपच कमी असल्याने मुंबईत दुधाची चणचण निर्माण होण्याची शक्‍यता आहे. 

Web Title: #MilkAgitation strike