#MilkAgitation जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने मोफत दुध वाटुन अंदोलन

राजकुमार शहा 
मंगळवार, 17 जुलै 2018

दुध उत्पादकांना प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्या आणि ते त्यांच्या खात्यावर जमा करा या मागणीसाठी जनहीत शेतकरी संघटनेच्या वतीने टाकळी सिकंदर चौकात नागरीकांना तसेच राज्य परिवहन बसच्या चालक वाहक व प्रवाशांना मोफत दुध वाटुन  अंदोलन करण्यात आले.

मोहोळ - दुध उत्पादकांना प्रती लिटर पाच रुपये अनुदान द्या आणि ते त्यांच्या खात्यावर जमा करा या मागणीसाठी जनहीत शेतकरी संघटनेच्या वतीने टाकळी सिकंदर चौकात नागरीकांना तसेच राज्य परिवहन बसच्या चालक वाहक व प्रवाशांना मोफत दुध वाटुन  अंदोलन करण्यात आले.

दुधाला दर वाढवुन द्या अशी मागणी दुध उत्पादक शेतकरी गेल्या अनेक दिवसापासून करीत आहेत. मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करीत आहे सध्या जनावरांना लागणाऱ्या पशुखाद्याचे दर वाढले आहेत. दुधाची आठवड्याची पगार व पशुखाद्याचे पैसे यांची बरोबरी होत असल्याने दुधउत्पादकांच्या हातात काय असा प्रश्न निर्माण झाला आहे.

शासनाने दुधाच्या भुकटीला प्रती किलो 50 रुपये अनुदान देवुन ठराविक दुध संघाला फायदा करून देण्याचे षडयंत्र रचले आहे. शासनाने मागण्या मान्य न केल्यास दुध संकलन होऊ देणार नसल्याचे संघटनेच्या वतीने देशमुख यांनी यावेळी सांगीतले आहे.  यावेळी विकास जाधव, गणेश शिन्दे, श्रीकांत नलवडे, सदाशीव वाघमोडे, नाना मोरे, दामाजी मोरे, विजय मोरे यांच्यासह कार्यकर्ते अंदोलनात सहभागी झाले होते.

Web Title: MilkAgitation in takali sinkandar chowk mohol