काँग्रेस नेत्याच्या हत्तेप्रकरणी एमआयएम नगरसेवकाला अटक

वृत्तसंस्था
रविवार, 2 जून 2019

विजापूर येथील काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनुर हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी सोलापूर एमआयएमचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक तौफिक शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक पोलिसांनी सोलापूर शहरातून तौफिक शेख याला अटक केली. आरोपी तौफिक शेखला उद्या विजापूर कोर्टात करणार हजर करण्यात येणार असून पैसे आणि प्रेम संबंधातून रेश्मा यांची हत्या झाल्याचा आरोप तौफिक शेखवर करण्यात आला आहे.

सोलापूर: विजापूर येथील काँग्रेसच्या पदाधिकारी रेश्मा पडेकनुर हत्येप्रकरणी फरार असलेला आरोपी सोलापूर एमआयएमचे शहराध्यक्ष आणि नगरसेवक तौफिक शेख याला पोलिसांनी अटक केली आहे. कर्नाटक पोलिसांनी सोलापूर शहरातून तौफिक शेख याला अटक केली. आरोपी तौफिक शेखला उद्या विजापूर कोर्टात करणार हजर करण्यात येणार असून पैसे आणि प्रेम संबंधातून रेश्मा यांची हत्या झाल्याचा आरोप तौफिक शेखवर करण्यात आला आहे.

दरम्यान, विजापूरजवळील कोलार गावात पुलाखाली रेश्‍मा पडकनूर यांचा मृतदेह काही दिवसांपूर्वी सापडला होता. जबर मारहाण करून त्यांचा मृतदेह टाकण्यात आल्याचे त्यावेळी स्पष्ट झाले होते. या खुनाच्या तपासाला पोलिसांनी गती दिल्यानंतर पोलिसांनी तौफिक शेखला अटक केली. 

रेश्‍मा पडकनूर या पूर्वी धर्मनिरपेक्ष जनता दल पक्षाच्या पदाधिकारी होत्या. आता त्या कॉंग्रेस पक्षात कार्यरत होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांची तौफिक शेखशी ओळख झाली होती असे सांगण्यात येत आहे. शेखने रेश्‍मा यांना हॉटेलमध्ये बोलाविले होते. "तुझ्या पतीजवळ भरपूर पैसा आहे, मला निवडणुकीकरिता पैशाची गरज आहे', असे म्हणून जबरदस्तीने पैशांची मागणी केली. रेश्‍मा यांनी आरडाओरड केल्यानंतर शेख यांनी गळा दाबला होता. त्यांना जिवे मारण्याची धमकीही दिली होती. याप्रकरणी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला होता.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MIM corporator arrested in Solapur for assaulting congress activist