वाळवा तालुक्‍यातील घरफोडयांपासून नायकवडींनी सावध राहावे

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 14 मार्च 2019

वाळवा - राज्यात राजकीय भूकंप होत आहेत. वाळव्यातही भुकंप झाला आहे. इस्लामपुर मतदारसंघात आम्हाला जे घडवायचे आहे ते घडेलच. मात्र वैभव काका व गाैरव भाऊ एकत्र राहिले पाहिजेत. कार्यकरर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, एकीने काम केल्यास वाळवा तालुक्‍यात चमत्कार अवघड नाही, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. वाळवा तालुक्‍यातील घरफोडयांपासून दोघांनी सावध राहावे, असेही ते म्हणाले. 

वाळवा - राज्यात राजकीय भूकंप होत आहेत. वाळव्यातही भुकंप झाला आहे. इस्लामपुर मतदारसंघात आम्हाला जे घडवायचे आहे ते घडेलच. मात्र वैभव काका व गाैरव भाऊ एकत्र राहिले पाहिजेत. कार्यकरर्त्यांनी त्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, एकीने काम केल्यास वाळवा तालुक्‍यात चमत्कार अवघड नाही, असे आवाहन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी येथे केले. वाळवा तालुक्‍यातील घरफोडयांपासून दोघांनी सावध राहावे, असेही ते म्हणाले. 

हुतात्मा दूध संघाचे अध्यक्ष, माजी सरपंच गौरव नायकवडी यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचा नागरी सत्कार झाला. त्यावेळी ते बोलत होते. कृषी मंत्री सदाभाऊ खोत, हुतात्मा उद्योग समूहाचे नेते वैभव नायकवडी, खासदार संजय पाटील, आमदार शिवाजीराव नाईक, सुधीर गाडगीळ भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख, माजी आमदार दिनकर पाटील, नितीन शिंदे, भगवानराव साळुंखे, निशिकांत पाटील, धैर्यशील माने, शेखर इनामदार, राहुल महाडिक, भीमराव माने, सी. बी. पाटील, पृथ्वीराज पवार, वैभव शिंदे, दीपक शिंदे, भारत पाटील यांच्यासह प्रमुख उपस्थित होते. गौरव नायकवडी यांचा त्यांनी चांदीची तलवार देऊन सत्कार केला.

श्री. पाटील म्हणाले,‘‘वैभव काका आणि गौरव भाऊ भाजपचे आहेत. किरकोळ फॉरमॅलीटी बाकी आहे. या काका पुतण्याला आम्ही हवी ती मदत करू. गौरव नायकवडी यांनी आदर्श सरपंच म्हणुन काम केले. सत्काराला जमलेली गर्दीत परिवर्तनाची नांदी आहे.’’

मंत्री खोत म्हणाले,‘‘आज जमलेली चाहत्यांची गर्दी भाजपाची सत्ता येणार हे दर्शवते. काका व भाऊंनी सामान्यांसाठी मोठे काम केले. येत्या निवडणुकीत परिवर्तन होईल.’’

खासदार पाटील म्हणाले, ‘‘गर्दीतला माणूस जाणणारा नेता म्हणजे गौरव नायकवडी.’’ श्री. देशमुख म्हणाले,‘‘राजकारणात विश्वासार्हता महत्त्वाची आहे. काका व भाऊ भाजपात या. तुम्हाला काही कमी पडणार नाही.’’

वैभव नायकवडी म्हणाले,‘‘मानसनमान मिळताना सामाजिक जबाबदारी वाढते. गौरव नायकवडी म्हणाले,‘‘चंद्रकांत पाटील व सदाभाऊंच्या माध्यमातून तालुक्‍यात कामे केलीत. भाजपात नसुनही या सरकारने आम्हाला मोठे सहकार्य केले.’’ गौरव नायकवडी म्हणाले,‘‘राजकारणापेक्षा समाजाला कुटुंब मानुन काम करतो. आमचा आत्तापर्यंत केवळ वापर झाला.
माझ्या साठी जमलेली गर्दी हिच संपत्ती आहे. क्रांतीवीर नागनाथअण्णा नायकवडींच्या कुटुंबात जन्माला आलो हे माझे भाग्य. तो वारसा नेटाने पुढे नेऊ.’’

उमेश घोरपडे यांनी प्रास्ताविक केले. उमेश कानडे यांनी आभार मानले. मानाजी सापकर, डॉ.अशोक माळी, संजय अहिर, राजू मुळीक, नंदु पाटील, भाऊ वाडकर यांनी संयोजन केले.

Web Title: Minister Chandrakantdada Patil comment