मंत्रिमंडळात वाळवा तालुक्यासाठी दोन आधार कोणते ?

विजय लोहार
मंगळवार, 17 डिसेंबर 2019

तांबवे पाच-सहा हजार लोकसंख्येचे गाव. कृष्णा काठावर वसले आहे. शेतीवाडी करणारे गाव. कृष्णा कारखान्याचे संस्थापक संचालक शहाजीराव पाटील यांचे थोरात जावई.

नेर्ले ( सांगली ) - वाळवा तालुक्‍यातील तांबवेचे जावई असलेले काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांची शालेय शिक्षण मंत्रिपदी निवड झाल्याबद्दल तांबवेसह जिल्ह्यात समाधानाचे वातावरण आहे. मंत्री जयंत पाटील यांच्यानंतर जिल्ह्यातील विशेषतः वाळवा तालुक्‍यातील लोकांना हक्काचा माणूस म्हणून थोरात यांच्याकडे पाहिले जाते. अशीच येथील लोकांची भावना आहे. 

तांबवे पाच-सहा हजार लोकसंख्येचे गाव. कृष्णा काठावर वसले आहे. शेतीवाडी करणारे गाव. कृष्णा कारखान्याचे संस्थापक संचालक शहाजीराव पाटील यांचे थोरात जावई. शहाजीरावांच्या कन्या कांचनताईं बाळासाहेबांच्या पत्नी. उद्योजक विजयसिंह पाटील, राजारामबापू दूध संघाचे माजी अध्यक्ष नेताजीराव पाटील, उद्योजक विक्रमसिंह पाटील व इंद्रजित पाटील हे त्यांचे मेहुणे
श्री. थोरात चौथ्यांदा मंत्रिपदी विराजमान झालेत. त्यांच्या रूपाने जिल्ह्याला हक्काचा आणखी एक मंत्री मिळाला. सन १९७८ पासून इंदिरा गांधींशी थोरात घराणे एकनिष्ठ आहे. भाऊसाहेब थोरात यांच्यावर श्रीमती गांधी यांचा विश्वास होता. आमदार जयंत पाटील यांना अर्थ तर थोरात यांना शालेय शिक्षण ही महत्त्वाची खाती मिळालीत. त्यांच्या निवडीने तांबवे परिसरात ‘दाजी’ मंत्री झाल्याची भावना आहे.

हेही वाचा - सांगली मिनी मंत्रालयात प्रशासक राजवट? 

थोरांतांनी सोडवले अनेकांचे प्रश्न

जिल्ह्यातील अनेकांची कामे बाळासाहेब थोरात यांनी केली आहेत. लोकांच्या अडचणी समजून अनेकांचे प्रश्न सोडवलेत. आजही जिल्ह्यातील कोणीही गेला तर आधी पाहुणचार, नंतर काम केले जाते. आम्हालाही अभिमान वाटतो.
- धैर्यशील पाटील,
संस्थापक, साईसम्राट उद्योग समूह

हेही वाचा - मोबाईल हॅंडसेटचा हप्ता बुडवण्याचा विचार करताय ... हे वाचाच ! 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Jayant Patil Balasaheb Thorat Beneficial For Walwa Taluka