
आष्टा : ‘‘ऊसदरासाठी आंदोलने सुरू होण्यापूर्वीच क्रांतिवीर नागनाथअण्णांनी उसाला चांगला दर देऊन आदर्श निर्माण केला होता,’’ असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांनी वाळवा येथे केले. क्रांतिवीर डॉ. नागनाथअण्णा नायकवडी यांच्या तेराव्या स्मृतिदिनी आयोजित सभेत ते बोलत होते.