महामार्गावर पुराचे पाणी आलेल्या ठिकाणी उड्डाण पुल उभारावेत

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 10 ऑगस्ट 2019

शिरोली पुलाची - सातारा कागल दरम्यान महामार्गावर पाच ते सहा ठिकाणी  महापूराचे पाणी आले आहे. ज्या ज्या ठिकाणी पाणी येऊन, वाहतूक ठप्प झाली, अशा ठिकाणी पिलरवरील उड्डाण पूल उभारावेत. कागल सातारा महामार्गाच्या सहापदरीकरणाच्या आराखड्यात त्याचा समावेश करावा, अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री एकनाथ शिंदे यांनी रस्ते विकास महामंडळाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

मंत्री शिंदे यांनी सांगली फाटा येथे भेट देऊन, राष्ट्रीय महामार्गावर आलेल्या महापूराच्या पाण्याची माहिती घेतली. यावेळी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार राजेश क्षीरसागर होते.

महामार्गाची उंची वाढल्यामुळे महापूराचे पाणी गावात शिरले असून, सुमारे पाचशे कुटुंबाचे स्थलातंर करावे लागले आहे. त्यामुळे सांगली फाटा ते तावडे हॉटेल उड्डाण पूल बांधावे.

- सरपंच शशिकांत खवरे

जिल्हा परिषदेचे माजी सदस्य महेश चव्हाण म्हणाले, चौपदरीकरणात महामार्गाची उंची वाढवण्यासाठी घातलेल्या भरावामुळे पूराच्या पाण्याला एक प्रकारे बांध घातला गेला आहे. त्यामुळे या वेळी २००५ पेक्षा बिकट स्थिती झालेली आहे.

मंत्री शिंदे यांनी माहिती घेऊन, रस्ते विकास मंडळाच्या अधिकाऱ्यांना फोन केला व कागल ते सातारा महामार्गावर पाच ते सहा ठिकाणी महापूराचे पाणी येऊन, वाहतूक ठप्प झाली आहे. त्या ठिकाणी भविष्यात अशी परिस्थिती येऊ नये, याकरिता पिलरवरील उड्डाण पूल उभारावेत. हे काम थोड खर्चिक आहे ; मात्र स्थानिक नागरिकांच्या सोयीचे व महामार्गावरील वाहतूक ठप्प होऊ नये यासाठी आहे. त्यामुळे महामार्ग सहापदरीकरणाच्या आराखड्यात त्याचा समावेश करावा.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister of Public Works Eknath Shinde comment