कोल्हापूर, सांगली पुरग्रस्तांसाठी 50 लाखांची मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑगस्ट 2019

कोल्हापूर -  पुरस्थितीमुळे  कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासन त्यांच्या पाठीशी आहे. शासनाकडून मदत मिळण्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करणार आहे. माझ्या खासदार फंडातून सांगलीसाठी 25 लाख आणि कोल्हापूरसाठी 25 लाख रुपयांची मदत मी जाहिर करतो, अशी घोषणा केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी आज पत्रकार परिषदेत केली.  

श्री. आठवले यांनी जिल्ह्यातील पूरपस्थितीची पाहणी केल्यानंतर येथील शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. जिल्हाधिकारी दौलत देसाई उपस्थित होते.

श्री. आठवले पुढे म्हणाले, रांगोळी, रेंदाळ, हुपरी, इंगळी, पट्टणकोडोली गावच्या संरपंचांशी आज चर्चा केली. पूराचा सामना करण्यासाठी सुरक्षित स्थळी घरं बांधता येतील असा आराखडा तयार करण्यास सांगितले आहे.

पूरग्रस्त गावांचं पुनर्वसन करण्याची केंद्रीय अर्थमंत्र्यांकडे मागणी करणार आहे. विमा कंपन्यांच्या माध्यमातून पूरग्रस्तांना नुकसान भरपरई मिळावी त्यासाठी आपण प्रयत्न करणार आहे. खासदार, आमदार, उद्योजक यांनीही पुढे येऊन मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले.  

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Minister Ramdas Athavale comment