esakal | ब्रेकिंग : बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांचा राजीनामा

बोलून बातमी शोधा

Minister Ramesh Jarkiholi resigned belgaum political marathi news}

बंगळूर पोलिस आयुक्तांकडे यासंबंधात तक्रार दाखल केली आहे.

ब्रेकिंग : बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकिहोळी यांचा राजीनामा
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

बेळगाव :  कर्नाटकात एका आक्षेपार्ह अश्लील सीडी प्रकरणावरून मोठी खळबळ उडाली आहे. या आक्षेपार्ह सीडी प्रकरणात कर्नाटकच्या भाजपा सरकारमधील जलसंसाधन मंत्री, कर्नाटकमधील भाजपचे नेते, बेळगावचे पालकमंत्री रमेश जारकीहोळी यांच्याविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. यात अडकलेल्या जलसंपदा मंत्री रमेश जारकीहोळी यांनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे.

एका युवतीला सरकारी नोकरी देण्याचे आमिष दाखवून मंत्री रमेश जारकीहोळी यांनी तिला जाळ्यात अडकविले व तिच्यावर अत्याचार केल्याचा आरोप नागरी होराट समितीचे अध्यक्ष व सामाजिक कार्यकर्ते दिनेश कल्लहोळ्ळी यांनी येथे केला. त्यांनी बंगळूर पोलिस आयुक्तांकडे यासंबंधात तक्रार दाखल केली आहे.

युवतीला कर्नाटक वीज प्रसारण मंडळात (केपीटीसीएल) नोकरी देण्याचे आमिष दाखवून जारकीहोळी यांनी तिची फसवणूक केल्याचा आरोपही कल्लहोळ्ळी यांनी तक्रार अर्जात केला आहे. दिल्लीतील कर्नाटक भवनमध्ये त्यांनी हे कृत्य केल्याचे सांगून सरकारी विश्रामधामाचा (आयबी) त्यांनी दुरुपयोगही केल्याचे म्हटले आहे. चित्रफीत जाहीर न करण्यासाठी तिला जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोपही त्यांनी केला.

हेही वाचा- राजकीय पार्श्‍वभूमी नसताना स्वयंपाक घरातून थेट महापौर पदाच्या  थेट खुर्चीत

जारकीहोळी यांच्या रासलीला प्रकरणामुळे येडियुराप्पा सरकारची बदनामी झाल्याची चर्चा आहे. मुख्यमंत्र्यांनी या संबंधात भाजप हायकमांडशी संपर्क साधल्याचे समजते. हायकमांड त्यांचा राजीनामा घेण्याचा मुख्यमंत्र्यांना सल्ला देणार का, याकडे सर्वांचे लक्ष होते.

संपादन- अर्चना बनगे