Miraj Crime News : दारू पिताना वाद, नशेत अविवाहित मित्राच्या डोक्यात जबर मारहाण; दिवसाढवळ्या मिरजेत रक्तरंजित घटना

Miraj assault case : मिरजेत दारू पिताना झालेल्या वादातून एका अविवाहित मित्रावर जीवघेणा हल्ला करण्यात आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
Miraj brutal assault case

Miraj brutal assault case

esakal

Updated on

Friend assaulted in intoxication : कवठेपिरान (ता. मिरज) येथे दारू पिताना झालेल्या वादातून तरुणाचा खून करण्यात आला. सचिन सुभाष पाटील (वय ३५) असे मृताचे नाव आहे. दुपारी दीडच्या सुमारास हा वाद झाला. संशयित हल्लेखोर खून करून घराला कुलूप लावून पळून गेला. मात्र, ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने त्याला दोन तासांत गजाआड केले. जगन्नाथ विलास भोसले (४०) असे त्याचे नाव आहे. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com