आषाढी यात्रेसाठी शनिवारपासून जादा रेल्वे 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 29 जून 2017

मिरज - पंढरपुरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी दोन जादा पॅसेंजर रेल्वे सोडण्यात येणार आहेत. 1 ते 9 जुलै या कालावधीत त्या धावतील. सोलापूर विभागातून ही माहीती दिली. 

मिरज - पंढरपुरच्या आषाढी एकादशी यात्रेसाठी दोन जादा पॅसेंजर रेल्वे सोडण्यात येणार आहेत. 1 ते 9 जुलै या कालावधीत त्या धावतील. सोलापूर विभागातून ही माहीती दिली. 

गाडी क्रमांक 01491 आणि 01492 ही मिरज-पंढरपूर-मिरज अशी धावेल. मिरजेतून पहाटे साडेपाच वाजता निघेल. पंढरपुरात सकाळी 8.20 वाजता पोहोचेल. सुमारे सव्वा तासांच्या विश्रांतीनंतर सकाळी 9.40 वाजता पंढरपुरातून सुटेल. दुपारी दिड वाजता मिरजेत येईल. 2.40 वाजता मिरजेतून सुटेल. ती कुर्डुवाडीपर्यंत जाईल. गाडी क्रमांक 01493 व 01494 ही मिरज-कुर्डुवाडी-मिरज अशी धावेल. कुर्डुवाडीतून रात्री साडेआठ वाजता सुटेल. मिरजेत रात्री 12.45 वाजता येईल. पहाटेपर्यंत थांबून तीच गाडी साडेपाच वाजता मिरज-पंढरपूर पॅसेंजर म्हणून सुटेल. जादा गाडी सर्व स्थानकांवर थांबेल. 

*दैनंदिन गाड्याही भाविकांसाठी उपलब्ध आहेत. त्यांचे वेळापत्रक असे ः 
मिरजेतून पंढरपूरकडे जाणाऱ्या गाड्या ः मिरज-कुर्डुवाडी पॅसेंजर - सकाळी 06.05, यशवंतपूर-पंढरपूर ( मंगळवार, शुक्रवार )- सकाळी 8.50, कोल्हापूर-नागपूर एक्‍स्प्रेस ( सोमवार व शुक्रवार )- दुपारी 02.10, मिरज-सोलापूर एक्‍सप्रेस - दुपारी 3.25, मिरज-पंढरपूर पॅसेंजर - संध्याकाळी 06.25, मिरज-परळी पॅसेंजर - रात्री 08.30, कोल्हापूर-सोलापूर एक्‍सप्रेस - मध्यरात्री 01.20 

पंढरपुरातून मिरजेला येण्यासाठी गाड्या 
सोलापूर-मिरज एक्‍सप्रेस - सकाळी 9.05, नागपूर-कोल्हापूर एक्‍स्प्रेस ( बुधवार व रविवार ) - सकाळी 10.10, कुर्डुवाडी-मिरज पॅसेंजर - सकाळी 11.53, पंढरपूर-यशवंतपूर ( मंगळवार, शुक्रवार ) - दुपारी 1.35, परळी - मिरज पॅसेंजर - दुपारी 02.15, पंढरपूर-मिरज पॅसेंजर - रात्री 09.16, सोलापूर-कोल्हापूर एक्‍सप्रेस - पहाटे 02.15. 

Web Title: miraj news Ashadhi Yatra railway