Fake Currency Racket
esakal
मिरज पोलिसांनी बनावट नोटा प्रकरणात मोठी कारवाई केली.
कोल्हापूर पोलिस दलातील इब्रार इनामदार मास्टरमाईंड असल्याचे स्पष्ट झाले.
जवळपास 99 लाख 29 हजार मूल्याच्या बनावट नोटा जप्त केल्या
मिरज : पाचशे, दोनशे रुपयांच्या बनावट नोटा (Fake Currency Racket) बनविणाऱ्या कोल्हापुरातील टोळीचा मिरजेच्या महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने (Kolhapur Police Officer) पर्दाफाश केला. या टोळीकडून ९९ लाख २९ हजार ३०० मूल्यांच्या बनावट नोटांसह इतर साहित्य असा एक कोटी ११ लाख सहा हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, बनावट नोटा बनविणाऱ्या या टोळीचा मास्टरमाईंड इब्रार इनामदार हा कोल्हापूर पोलिस दलात कार्यरत आहे, अशी माहिती सांगलीचे पोलिस अधीक्षक संदीप घुगे यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.