पुरामुळे मिरज रेल्वे जंक्शनची पाणी योजना ठप्प; एक्सप्रेस गाड्यांत पाण्याची समस्या

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

मिरज - येथे कृष्णा नदीच्या पुरामुळे मिरज रेल्वे जंक्शनची स्वतंत्र पाणी उपसा योजना बंद पडली आहे, परिणामी जंक्शनचा पाणीपुरवठा आज सकाळपासून ठप्प झाला. स्थानकात पिण्याच्या पाण्याबरोबर स्वछतेची समस्या निर्माण झाल्याने रेल्वे प्रशासनाने टँकर मागवले आहेत.  

बेळगाव ते पुणे आणि कोल्हापूर ते मिरज दरम्यानच्या सर्व रेल्वेगाड्यांत मिरजमध्येच पाणी भरले जाते, पण रेल्वेची पाणीयोजना बंद झाल्याने एक्सप्रेस गाड्यांत पाणी भरणे बंद झाले आहे. गुजरात, राजस्थान, दिल्लीकडून आलेल्या रेल्वेमध्ये पाणी भरता आले नाही, त्यामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.  

रेल्वेच्या माहितीसाठी स्वतंत्र यंत्रणा

राज्यातील बऱ्याच भागात पुरस्थिती निर्माण झाल्याने रेल्वे वेळापत्रक कोलमडले आहे.  त्याची माहिती देण्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून मिरज  स्थानकात स्वतंत्र यंत्रणा निर्माण करण्यात आली आहे.  प्रवाशांनी व नागरिकांनी  0233 - 2223282 या क्रमांकावर संपर्क करण्याचे असे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Miraj Railway Junction water project blocked due to floods; Water problems in express trains