

मिरज शहरात झटपट पैसे कमावण्यासाठी अल्पवयीन मुलं गांजा विक्रीच्या नादात गुंतली...
esakal
Miraj Police : मिरज शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर उद्यानाच्या पिछाडीस गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन अल्पवयीन मुलांकडून तब्बल दोन किलो गांजा जप्त केला. झटपट पैसे मिळवण्यासाठी आणि चैन करण्याच्या उद्देशाने दोघेही गांजा विक्रीच्या तयारीत होते. त्यांच्याकडील दोन किलो गांजा आणि सुमारे ७० हजार रुपये किमतीची दुचाकी असा मिळून १ लाख २० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. महात्मा गांधी चौक पोलिस ठाण्याच्या पथकाने ही कारवाई केली.