मिरज-सोलापूर रेल्वेच्या वेळापत्रकात बदल

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 24 एप्रिल 2018

सोलापूर - सोलापूर-मिरज रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करण्याचा प्रस्ताव सोलापूर विभागाला पाठविण्यात आला आहे. तो मंजुरीसाठी मुंबई विभागाकडे पाठविण्यात आल्याची माहिती प्रवासी सेवा संघाचे अध्यक्ष संजय पाटील यांनी दिली. तसेच, वडशिंगे ते भिगवण दरम्यानचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम डिसेंबर 2019पर्यंत पूर्ण होणार असल्याचे त्यांनी सांगितले.

सोलापूर विभागाची रेल्वे मिरजकडे सोडण्यात आली आहे; परंतु प्रवाशांच्या मागणीनुसार या रेल्वेच्या वेळापत्रकात बदल करावा, असा प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. त्यानुसार सकाळी सहाऐवजी सात वाजता सोलापूरहून मिरजला सोडावी आणि मिरजहून दुपारी 3.25 ऐवजी चार वाजता सोलापूरला सोडावी, अशी मागणी करण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले.

Web Title: miraj-solapur railway time table change