याद राखा, गाठ माझ्याशीय, कोणते आमदार म्हणाले...

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 7 फेब्रुवारी 2020

राहाता : अकरा गावांतील जनतेची गाऱ्हाणी ऐकण्यासाठी काल येथील पंचायत समिती कार्यालयात आयोजित जनता दरबारात आमदार आशुतोष काळे यांनी अधिकाऱ्यांना सुनावले.

प्रांताधिकारी गोविंद शिंदे, तहसीलदार कुंदन हिरे, विमानतळ विकास प्राधिकरणाचे संचालक दीपक शास्त्री यांच्यासह सार्वजनिक बांधकाम, महामार्ग, वीजवितरण कंपनी आदी खात्यांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

जाणून घ्या - कोरोनामुळे वाचला कोंबड्यांचा जीव

दुजाभावाची वागणूक नको

""कोपरगाव विधानसभा मतदारसंघात समाविष्ट झालेल्या राहाता तालुक्‍यातील अकरा गावांतील जनतेला दुजाभावाची वागणूक देऊ नका. अडवणूक करून त्यांच्याकडून पैसे घेऊ नका. सामान्य लोकांना त्रास दिला, तर मी खपवून घेणार नाही,'' अशा शब्दांत आमदार आशुतोष काळे यांनी आज विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांना खडसावले. 

अधिकारी जुमानत नाहीत अो..
या जनता दरबारास मोठी गर्दी झाली होती. पुणतांबे ते कोपरगाव रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे पडले आहेत. पुणतांबे ते रामपूर रस्ता हरवल्याने त्यावरून पायीदेखील चालता येत नाही. रोहित्र जळाले. महिना लोटला तरी अधिकारी व कर्मचारी दाद देत नाहीत. घरकुल मंजूर; मात्र जागा नाही, अधिकारी जुमानत नाहीत, कुठलीच कामे होत नाहीत, पदोपदी अडवणूक होते, अशा तक्रारी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मांडल्या. आमदार काळे यांनी, या तक्रारी सोडविण्यासाठी तुम्ही आजवर काय केले, असा सवाल अधिकाऱ्यांना केला. ही कामे वेळेत केली नाही आणि जनतेची अडवणूक केली, तर खपवून घेणार नाही, असा इशारा दिला. 

३७ लाखांचा निधी

कोपरगाव येथील न्यायालयाच्या नूतन इमारतीच्या खर्चास विधी व न्याय विभागाने नुकतीच मंजुरी दिली. या इमारतीच्या स्थलांतरासाठी 37 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला. राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जनतेची कामे करणारे सरकार आहे, असेही आमदार आशुतोष काळे यांनी स्पष्ट केले. या वेळी नंदकुमार सदाफळ, खंडेराव वहाडणे, संपत शेळके, विलास गुंजाळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. 
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: MLA Ashutosh Kale gets angry at officers