प्रा. डाॅ. सावंत यांच्या माध्यमातून उर्वरित विकासासाठी आम्ही प्रयत्न करू : बबनराव शिंदे

Tanaji Sawant
Tanaji Sawant

उपळाई बुद्रूक (जि. सोलापुर) : माढा तालुक्याच्या विकासासाठी तालुक्यातील उर्वरीत विकास कामे नुतन कॅबिनेटमंत्री आमदार डाॅ तानाजीराव सावंत यांच्या माध्यामातुन पुर्ण करण्याचा आम्ही सर्वजण मिळून प्रयत्न करू असे मत आमदार बबनराव शिंदे यांनी 'सकाळ' शी बोलताना व्यक्त केले.

माढा तालुक्याच्या राजकारणात आमदार बबनराव शिंदे यांचे कडवे विरोधक म्हणुन वाकावच्या सावंत कुटुंबियांची ओळख आहे. गेली १५ वर्षापासून माढा तालुक्यात शिंदे विरुध्द सावंत अशीच लढत राहिलेली आहे. पण इतर तालुक्यात दिसणारे टोकाचे राजकारण इथे दिसत नाही. तालुक्याच्या विकासासाठी सर्वच नेतेमंडळी निवडणुकीपुरते राजकारण करून इतर वेळी एकमेकांना सहकार्य करताना दिसतात हे खरे आहे. परंतु आमदार बबनराव शिंदे हे गेली काही दिवसांपासून भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जाते. त्यामुळेच तर आमदार शिंदे त्यांच्या माध्यामातुन उर्वरित विकासासाठी आम्ही सर्वजण प्रयत्न करू असे तर म्हणले नाही ना? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. परंतु तालुक्याच्या विकासासाठी हे दोन भुमिपुत्र एकत्र येणार का? हा येणारा काळच ठरवेल.

आमदार शिंदे यांना भाजप प्रवेशावर विचारले असता म्हणाले की, चर्चा काहीही होत असतात. परंतु मी आहे तिथेच आहे. पण भाजप प्रवेश करणार नाय असेही म्हणाले नाहीत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com